विराटसाठी कसोटी मालिकेची सुरवात यापेक्षा उत्कृष्ठ असूच शकत नाही

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात शतकी खेळी करत भारताचे या सामन्यातील आव्हान जिवंत ठेवले होते.

या डावात 100 धावांच्या आतच भारताचा निम्मा संघ गारद झाला असताना विराटने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत भारताचा डाव संभाळत 225 चेंडूत 149 धावा केल्या होत्या. यात त्याने 22 चौकार आणि 1 षटकार मारला.

त्याचे हे इंग्लंडमधील कसोटीत पहिलेच शतक असुन एकूण 22 वे शतक आहे.

तर दुसऱ्या डावात 194 धावांचा पाठलाग करताने पुन्हा एकदा भारताची आघाडीची फळी कोसळली असताना विराट खेळपट्टीवर तिसऱ्या दिवस अखेर नाबाद 43 धावा करत इंग्लंडला एकाकी टक्कर देत आहे.

विराटने केलेल्या या कर्णधारपदाला साजेशी खेळीने त्याचा रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा माजी संघ सहकारी क्रिस गेलने विराटचे तोंडभरुन कौतूक केले आहे.

“पहिल्या डावातील विराटची शतकी खेळी कर्णधारपदाला साजेशी होती. भारतासाठी आणि विराटसाठी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेची यापेक्षा उत्कृष्ठ सुरवात असूच शकत नाही. विराटने इंग्लंडला एकहाती लढत दिली. मला वाटते त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे सर्वोत्तम शतक आहे. मला आशा आहे की विराटची ही शतकी खेळी भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल.” असे क्रिस गेल विराटच्या शतकी खेळीचे कौतूक करताना म्हणाला.

भारताचा हा इंग्लंड दौरा भारताच्या आणि विराटच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या दौऱ्यात विराट आणि भारताला इंग्लंडमधील कामगिरी सुधारण्यासाठी इंग्लंडला जोरदार टक्कर द्यावी लागणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जॉन्ग-उनची भारत-इंग्लंड सामन्याला हजेरी!

पहाटे ३ वाजता संपला सामना, खेळाडूने मैदानातच केली रडायला सुरूवात