Australian Open 2018: द्वितीय मानांकित कॅरोलिन वोझनीयाकी अंतिम फेरीत दाखल

मेलबर्न । डेन्मार्कची कॅरोलिन वोझनीयाकीने ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. तिने बिगमानंकित एलिस मर्टन्सला ६-३, ७-६(७-२) असे पराभूत केले आहे.

तिने कारकिर्दीत तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली असून तिने यापूर्वी २००९ आणि २०१४मध्ये अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठली होती.

एलिस मर्टन्स डब्लूटीए क्रमवारीत ३७व्या स्थानावर असून तिला २७ वर्षीय वोझनीयाकीने संपूर्ण सामन्यात कोणतीही संधी दिली नाही.

तिचा अंतिम फेरीत सामना दुसऱ्या उपांत्यफेरीत विजय मिळवलेल्या खेळाडूशी होणार आहे. सध्या दुसरी उपांत्यफेरी सिमोना हॅलेप विरुद्ध अँजेलिक कर्बर अशी सुरु आहे.

जर दुसरी उपांत्यफेरी अँजेलिक कर्बरने जिंकली तर कॅरोलिन वोझनीयाकी ब्लूटीए क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणार आहे.