क्रिकेट – Maha Sports https://mahasports.co.in India's first Marathi Sports News Website Sun, 08 Sep 2019 09:01:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.2.3 https://mahasports.co.in/wp-content/uploads/2018/06/cropped-Maha-Sports-Fav-Icon-32x32.png क्रिकेट – Maha Sports https://mahasports.co.in 32 32 125942317 असा होणार आहे पुढीलवर्षी महिला टी२० विश्वचषक, जाणून घ्या सर्वकाही… https://mahasports.co.in/icc-women-t20-world-cup-schedule-announced/ https://mahasports.co.in/icc-women-t20-world-cup-schedule-announced/#respond Sun, 08 Sep 2019 09:01:30 +0000 https://mahasports.co.in/?p=52588

पुढीलवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियात आयसीसी महिली टी20 विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकाचा संपूर्ण कार्यक्रम आयसीसीने जाहिर केला आहे. या विश्वचषकात एकूण 10 महिला संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये गतविजेता ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, बांगलादेश आणि थायलंड संघांचा समावेश आहे. यातील बांगलादेश आणि थायलंड संघांनी पात्रता फेरीतून मुख्य विश्वचषक स्पर्धेत प्रवेश […]

www.mahasports.co.in

]]>

पुढीलवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियात आयसीसी महिली टी20 विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकाचा संपूर्ण कार्यक्रम आयसीसीने जाहिर केला आहे.

या विश्वचषकात एकूण 10 महिला संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये गतविजेता ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, बांगलादेश आणि थायलंड संघांचा समावेश आहे. यातील बांगलादेश आणि थायलंड संघांनी पात्रता फेरीतून मुख्य विश्वचषक स्पर्धेत प्रवेश केला आहे. तर अन्य 8 संघांना थेट प्रवेश मिळाला आहे.

या विश्वचषकातील साखळीफेरी 2 गटात होईल. अ गटामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेश संघाचा समावेश आहे. तर ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि थायलंड संघाचा समावेश आहे. थायलंड संघाचा हा पहिलाच विश्वचषक आहे.

ही स्पर्धा 21 फ्रेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान होणार असून एकूण 23 सामने या स्पर्धेत होणार आहेत. 21 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान या स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने होतील. त्यानंतर दोन्ही गटातील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. दोन्ही उपांत्य सामने 5 मार्चला सिडनीमध्ये पार पडतील.

यानंतर 8 मार्चला अंतिम सामना मेलबर्नला होईल. 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो.

या स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारतीय महिला संघात 21 फेब्रुवारीला सिडनी येथे होईल.

भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यानंतर साखळी फेरीत बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्ध अनुक्रमे 24 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारीला सामने खेळेल.

2020 आयसीसी महिला टी20 विश्वचषकात असे होतील भारताचे सामने – 

साखळी फेरी –

21 फेब्रुवारी – भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला (वेळ – दुपारी 1.30 वाजता)

24 फेब्रुवारी – भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला (वेळ – दुपारी 4.30 वाजता)

27 फेब्रुवारी – भारतीय महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला (वेळ – सकाळी 8.30 वाजता)

29 फेब्रुवारी – भारतीय महिला विरुद्ध श्रीलंका महिला (वेळ – सकाळी 8.30 वाजता)

उपांत्य फेरी – 

5 मार्च – पहिला सामना -अ गटातील अव्वल क्रमांकचा संघ विरुद्ध ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ (वेळ – सकाळी 8.30 वाजता)

5 मार्च – दुसरा सामना – ब गटातील अव्वल क्रमांकचा संघ विरुद्ध अ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ (वेळ – दुपारी 1.30 वाजता)

अंतिम सामना – 

8 मार्च – उपांत्य सामना 1 मधील विजेता विरुद्ध उपांत्य सामना 2 मधील विजेता (वेळ – दुपारी 1.30 वाजता)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha सा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

चौथ्या ऍशेस सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर झाले हे ३ नकोसे विक्रम

या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरने विराट कोहली, अमलाला मागे टाकत रचला नवा इतिहास

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/icc-women-t20-world-cup-schedule-announced/feed/ 0 52588
चौथ्या ऍशेस सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर झाले हे ३ नकोसे विक्रम https://mahasports.co.in/david-warner-3-unwanted-record-in-4th-ashes-test/ https://mahasports.co.in/david-warner-3-unwanted-record-in-4th-ashes-test/#respond Sun, 08 Sep 2019 06:31:27 +0000 https://mahasports.co.in/?p=52581

मँचेस्टर। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ओल्ड ट्रॅफर्डवर सुरु असलेल्या चौथ्या ऍशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 6 बाद 186 धावांवर घोषित करत पहिल्या डावातील 196 धावांच्या आघाडीसह इंग्लंडला विजायासाठी 383 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करतना चौथ्या दिवसाखेर इंग्लंडने 2 विकेट गमावत 18 धावा केल्या आहेत. तसेच ते अजून 365 धावांनी पिछाडीवर आहेत. […]

www.mahasports.co.in

]]>

मँचेस्टर। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ओल्ड ट्रॅफर्डवर सुरु असलेल्या चौथ्या ऍशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 6 बाद 186 धावांवर घोषित करत पहिल्या डावातील 196 धावांच्या आघाडीसह इंग्लंडला विजायासाठी 383 धावांचे आव्हान दिले आहे.

या आव्हानाचा पाठलाग करतना चौथ्या दिवसाखेर इंग्लंडने 2 विकेट गमावत 18 धावा केल्या आहेत. तसेच ते अजून 365 धावांनी पिछाडीवर आहेत.

ऑस्ट्रेलिया या सामन्यात जरी भक्कम स्थितीत असली तरी त्यांचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या फलंदाजी करताना संघर्ष करत आहे. तो या सामन्यातील दोन्ही डावात शून्य धावेवर बाद झाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही डावात त्याला इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले आहे.

त्याचबरोबर वॉर्नरने शून्य धावेवर बाद होण्याची 2019 ऍशेस मालिकेतील ही तिसरी वेळ असून तो सलग तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे त्याच्या नावावर काही नकोसे विक्रम झाले आहेत.

वॉर्नरने केले हे नकोसे विक्रम –

#ब्रॉडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज –

3 – डेव्हिड वॉर्नर

2 – एबी डीविलिएर्स, रॉस टेलर, अझर अली, टॉम लॅथम, केएल राहुल, विरेंद्र सेहवाग, पीटर सिडल, जेपी ड्यूमिनी, सुरंगा लकमल

#ऍशेसमधील एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शून्यावर बाद होणारा वॉर्नर 10 वा सलामीवीर फलंदाज.

#2019 च्या ऍशेस मालिकेत वॉर्नर सातव्यांदा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. त्यामुळे एका कसोटी मालिकेत सलामीवीर फलंदाजाने सर्वाधिकवेळा एकेरी धावसंख्येवर बाद होण्याच्या विश्वविक्रमाशी वॉर्नरने बरोबरी केली आहे.

एका कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा एकेरी धावसंख्येवर बाद होणारे सलामीवीर फलंदाज-

7 – अंशुमन गायकवाड (विरुद्ध विंडीज, 1083-84)

7 – माईक अर्थरटॉन (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1997)

7 – डेव्हिड वॉर्नर (विरुद्ध इंग्लंड, 2019)

#कसोटीमध्ये डेव्हिड वॉर्नरला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज – 

11 – स्टुअर्ट ब्रॉड 

9 – जेम्स अँडरसन

9 – आर अश्विन

6 – उमेश यादव

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरने विराट कोहली, अमलाला मागे टाकत रचला नवा इतिहास

परदीप नरवालने प्रो कबड्डीत ‘सुपर टेन’चे अर्धशतक पूर्ण करताच रचला इतिहास

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/david-warner-3-unwanted-record-in-4th-ashes-test/feed/ 0 52581
या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरने विराट कोहली, अमलाला मागे टाकत रचला नवा इतिहास https://mahasports.co.in/australias-meg%e2%80%89lanning-beats-virat-kohli-hashim-amlas-record/ https://mahasports.co.in/australias-meg%e2%80%89lanning-beats-virat-kohli-hashim-amlas-record/#respond Fri, 06 Sep 2019 14:26:55 +0000 https://mahasports.co.in/?p=52570

गुरुवारी(5 सप्टेंबर) वेस्ट इंडीज महिला संघाविरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 178 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग आणि एलिसा हेलीने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. हेलीने 106 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह 122 धावांची खेळी केली. तर लेनिंगने 145 चेंडूत 121 धावांची […]

www.mahasports.co.in

]]>

गुरुवारी(5 सप्टेंबर) वेस्ट इंडीज महिला संघाविरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 178 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग आणि एलिसा हेलीने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.

हेलीने 106 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह 122 धावांची खेळी केली. तर लेनिंगने 145 चेंडूत 121 धावांची खेळी केली. यात तिने 12 चौकार आणि 4 षटकार मारले. याबरोबरच कर्णधार लेनिंगने एक खास विश्वविक्रम रचला आहे.

लेनिंगचे हे वनडे कारकिर्दीत 76 डावात खेळताना केलेले 13 वे शतक आहे. त्यामुळे ती महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेटपटूंमध्ये सर्वात जलद 13 वनडे शतके करणारी क्रिकेटपटू ठरली आहे.

तिने हा विश्वविक्रम करताना दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमलाला मागे टाकले आहे. अमलाने 13 शतके 83 वनडे डावात केले होते.

या यादीत लेनिंग आणि अमलाच्या पाठोपाठ संयुक्तरित्या भारताचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटॉन डीकॉक आहे. या दोघांनीही प्रत्येकी 86 वनडे डावात 13 शतके केली होती.

महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारी क्रिकेटपटू – 

लेनिंग महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारी क्रिकेटपटू आहे. आत्तापर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूला 13 वनडे शतके करता आलेली नाही.  त्यामुळे लेनिंग 13 वनडे शतके करणारी पहिलीच पहिला क्रिकेटपटू ठरली आहे.

गुरुवारी पार पडलेल्या वेस्ट इंडीज महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघातील सामन्यात ऑस्ट्रेलिया महिलांनी लेनिंग आणि हेलीच्या शतकांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 308 धावा केल्या होत्या आणि वेस्ट इंडीज महिलांसमोर विजयासाठी 309 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज महिलांना 37.3 षटकात सर्वबाद 130 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून केवळ कर्णधार स्टिफनी टेलरने नाबाद 70 धावांची खेळी करत एकाकी झूंज दिली.

#वनडेमध्ये सर्वात जलद 13 शतके करणारे क्रिकेटपटू (महिला आणि पुरुष क्रिकेटपटू मिळून) – 

76  डाव – मेग लेनिंग

83 डाव – हाशिम अमला

86 डाव – विराट कोहली

86 डाव – क्विंटॉन डी कॉक

91 डाव – डेव्हिड वॉर्नर

99 डाव – शिखर धवन

#महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या क्रिकेटपटू – 

13 शतके – मेग लेनिंग (ऑस्ट्रेलिया)

10 शतके – सुझी बेट्स (न्यूझीलंड)

9 शतके – शार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड)

8 शतके – क्लेअर टेलर (इंग्लंड)

8 शतके – कारेल रोल्टॉन (ऑस्ट्रेलिया)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

टीम इंडीयाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ व्या वनडेत शानदार विजय मिळत मालिकाही जिंकली

…म्हणून विंडीज विरुद्ध अश्विन ऐवजी जडेजाला मिळाली संधी, कोहलीने केला खूलासा

भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवने घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन, पहा व्हिडिओ

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/australias-meg%e2%80%89lanning-beats-virat-kohli-hashim-amlas-record/feed/ 0 52570
टीम इंडीयाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ व्या वनडेत शानदार विजय मिळत मालिकाही जिंकली https://mahasports.co.in/india-a-clinch-the-5-match-one-day-series-against-south-africa-a-4-1/ https://mahasports.co.in/india-a-clinch-the-5-match-one-day-series-against-south-africa-a-4-1/#respond Fri, 06 Sep 2019 13:04:28 +0000 https://mahasports.co.in/?p=52562

तिरुअनंतपूरम। आज(6 सप्टेंबर) भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघात 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना पार पडला. पावसाच्या व्यत्ययामुळे 20-20 षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात भारताने 36 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबर भारतीय संघाने ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला या सामन्याचा सामनावीर पुरस्कार मिळाला. त्याने […]

www.mahasports.co.in

]]>

तिरुअनंतपूरम। आज(6 सप्टेंबर) भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघात 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना पार पडला. पावसाच्या व्यत्ययामुळे 20-20 षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात भारताने 36 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबर भारतीय संघाने ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली.

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला या सामन्याचा सामनावीर पुरस्कार मिळाला. त्याने या सामन्यात 48 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांसह 91 धावांची खेळी केली. तसेच त्याच्याबरोबरच शिखर धवनने 36 चेंडूत 51 धावांची खेळी केली. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरनेही 19 चेंडूत 36 धावांची छोटेखानी खेळी केली.

त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 204 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य दिले. दक्षिण आफ्रिकेकडून ब्युरन हेंड्रिक्स आणि जॉर्ज लिंडने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

यानंतर 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात सर्वबाद 168 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून रिझा हेंड्रिक्सने 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच काइल व्हररिनने 44 धावांची खेळी करत चांगली लढत दिली. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.

भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स तर इशान पोरेल, तुषार देशपांडे, राहुल चहर आणि शिवम दुबेने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

या 5 वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिले तीन सामने भारताने जिंकले होते. पण भारताला चौथ्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर पाचव्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेचा शेवट गोड केला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

…म्हणून विंडीज विरुद्ध अश्विन ऐवजी जडेजाला मिळाली संधी, कोहलीने केला खूलासा

भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवने घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन, पहा व्हिडिओ

ऍशेसमध्ये अशी कामगिरी करणारा स्टिव्ह स्मिथ पहिलाच फलंदाज!

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/india-a-clinch-the-5-match-one-day-series-against-south-africa-a-4-1/feed/ 0 52562
…म्हणून विंडीज विरुद्ध अश्विन ऐवजी जडेजाला मिळाली संधी, कोहलीने केला खूलासा https://mahasports.co.in/why-ravindra-jadeja-and-not-ashwin-virat-kohli-answers/ https://mahasports.co.in/why-ravindra-jadeja-and-not-ashwin-virat-kohli-answers/#respond Fri, 06 Sep 2019 12:26:20 +0000 https://mahasports.co.in/?p=52559

भारतीय संघाचा नुकताच वेस्ट इंडीज दौरा संपला आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजवर पूर्णपणे वर्चस्व ठेवताना टी20, वनडे आणि कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. पण या दौऱ्यातील दोन्ही कसोटी सामन्यात भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात फिरकीपटू आर अश्विनला संधी न मिळाल्याने बरीच चर्चा झाली. अश्विनने वेस्ट इंडीज विरुद्ध आत्तापर्यंत 11 कसोटीत 60 विकेट्स घेतले […]

www.mahasports.co.in

]]>

भारतीय संघाचा नुकताच वेस्ट इंडीज दौरा संपला आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजवर पूर्णपणे वर्चस्व ठेवताना टी20, वनडे आणि कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. पण या दौऱ्यातील दोन्ही कसोटी सामन्यात भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात फिरकीपटू आर अश्विनला संधी न मिळाल्याने बरीच चर्चा झाली.

अश्विनने वेस्ट इंडीज विरुद्ध आत्तापर्यंत 11 कसोटीत 60 विकेट्स घेतले आहेत. तसेच चार शतकेही केली आहेत. त्याची ही कामगिरी चांगली असतानाही त्याला 2019 च्या वेस्ट इंडीज दौऱ्यातील कसोटी सामन्यांसाठी 11 जणांच्या संघात संधी न मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

त्याच्याऐवजी भारतीय संघात अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला पसंती मिळाली. यामागील कारण भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे.

विराट म्हणाला, ‘जडेजाच्या मदतीने आम्ही नियंत्रण राखू शकत होतो. तो परदेशातील सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण आणि अचूक गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. त्याचमुळे तो 11 जणांच्या संघात सातत्याने राहत आहे.’

‘जरी खेळपट्टी मदत करणारी नसली तरी तो तूम्हाला सामन्यात नियंत्रण राखून देतो. जडेजा नेहमीच कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळतो आणि त्याचा हाच यूएसपी आहे.’

तसेच विराट जडेजाला संधी देण्यामागील कारण सांगताना म्हणाला, ‘क्रिकेटच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीन्ही क्षेत्रात त्याच्यापेक्षा कोणीही सर्वोत्तम नाही. तो सध्या चांगल्या लयीत आहे आणि संघासाठी योगदान देण्यास इच्छूक आहे. त्याला गोलंदाजी करायची आहे आणि नेहमी खेळत राहयचे आहे.’

जडेजाने या वेस्ट इंडीज दौऱ्यात कसोटीमध्ये 4 डावात 6 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 3 डावात 75 धावा केल्या. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवने घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन, पहा व्हिडिओ

ऍशेसमध्ये अशी कामगिरी करणारा स्टिव्ह स्मिथ पहिलाच फलंदाज!

तब्बल १२५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडून टिम पेनने केला असा मोठा कारनामा

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/why-ravindra-jadeja-and-not-ashwin-virat-kohli-answers/feed/ 0 52559
भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवने घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन, पहा व्हिडिओ https://mahasports.co.in/kedar-jadhav-takes-blessing-from-shrimant-dagadushath-halwai-ganpati/ https://mahasports.co.in/kedar-jadhav-takes-blessing-from-shrimant-dagadushath-halwai-ganpati/#respond Fri, 06 Sep 2019 10:44:31 +0000 https://mahasports.co.in/?p=52551

देशभरात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या गणेशोस्तवाच्या काळात दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी होते. यामध्ये अनेक सेलिब्रेटीही दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. आज भारताचा क्रिकेटपटू केदार जाधवनेही कुटुंबासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली. तसेच त्याने बाप्पाकडे […]

www.mahasports.co.in

]]>

देशभरात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या गणेशोस्तवाच्या काळात दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी होते. यामध्ये अनेक सेलिब्रेटीही दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात.

आज भारताचा क्रिकेटपटू केदार जाधवनेही कुटुंबासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली. तसेच त्याने बाप्पाकडे आई-वडीलांची तंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला जे यश मिळाले त्यासाठी त्याने बाप्पाचे आभार मानले आहेत.

केदार दर्शन घेऊन झाल्यावर असेही म्हणाला की ‘मी नेहमी बाप्पाकडे मागत असतो. यावेळी फक्त आभार मानले आहेत.’

केदारने भारताकडून शेवटचा सामना वेस्ट इंडीज दौऱ्यात 14 ऑगस्टला खेळला आहे. तसेच त्याआधी केदार इंग्लंडमध्ये पार पडलेल्या 2019 विश्वचषकात भारताकडून खेळला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

ऍशेसमध्ये अशी कामगिरी करणारा स्टिव्ह स्मिथ पहिलाच फलंदाज!

तब्बल १२५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडून टिम पेनने केला असा मोठा कारनामा

स्टिव्ह स्मिथने मास्टर ब्लास्टर तेंडूलकरपेक्षा १५ डाव कमी खेळताना केला मोठा पराक्रम

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/kedar-jadhav-takes-blessing-from-shrimant-dagadushath-halwai-ganpati/feed/ 0 52551
ऍशेसमध्ये अशी कामगिरी करणारा स्टिव्ह स्मिथ पहिलाच फलंदाज! https://mahasports.co.in/third-ashes-double-hundreds-for-steven-smith-only-bradman-8-and-hammond-4-have-got-more/ https://mahasports.co.in/third-ashes-double-hundreds-for-steven-smith-only-bradman-8-and-hammond-4-have-got-more/#respond Fri, 06 Sep 2019 10:03:40 +0000 https://mahasports.co.in/?p=52548

मँचेस्टर। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या चौथ्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 8 बाद 497 धावांवर घोषित केला. त्यांच्याकडून स्टिव्ह स्मिथने द्विशतकी खेळी केली. स्मिथने या सामन्यात 319 चेंडूत 211 धावा केल्या. या खेळीत त्याने 24 चौकार आणि 2 षटकार मारले. स्मिथचे हे कसोटी कारकिर्दीतील तसेच ऍशेसमधीलही तिसरे द्विशतक आहे. त्यामुळे तो ऍशेस कसोटी मालिकेमध्ये […]

www.mahasports.co.in

]]>

मँचेस्टर। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या चौथ्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 8 बाद 497 धावांवर घोषित केला. त्यांच्याकडून स्टिव्ह स्मिथने द्विशतकी खेळी केली.

स्मिथने या सामन्यात 319 चेंडूत 211 धावा केल्या. या खेळीत त्याने 24 चौकार आणि 2 षटकार मारले. स्मिथचे हे कसोटी कारकिर्दीतील तसेच ऍशेसमधीलही तिसरे द्विशतक आहे.

त्यामुळे तो ऍशेस कसोटी मालिकेमध्ये सर्वाधिक द्विशतके करण्याच्या यादीत डॉन ब्रॅडमन आणि वॅली हॅमंड यांच्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ब्रॅडमन यांनी ऍशेसमध्ये 8 वेळा एका डावात 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर हॅमंड यांनी 4 वेळा असा कारनामा केला आहे.

स्मिथने त्याची ही द्विशतके 2015, 2017 आणि 2019 अशा सलग तीन ऍशेस मालिकेत प्रत्येकी एक अशी केली आहेत. त्यामुळे तो सलग तीन ऍशेस मालिकेत द्विशतक करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

ऍशेसमध्ये त्याने जूलै 2015 ला लॉर्ड्सवर 215 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने 2017 च्या ऍशेसमध्ये पर्थमध्ये 239 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने सध्या चालू असलेल्या ऍशेस मालिकेत चौथ्या कसोटीत द्विशतकी खेळी केली आहे.

सध्या सुरु असलेल्या  2019 ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत स्मिथने 211 धावा करताना तिसऱ्या विकेटसाठी मार्नस लॅब्यूशानेबरोबर 116 धावांची तर कर्णधार टिम पेनबरोबर  सहाव्या विकेटसाठी 145 धावांची भागीदारी केली. या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात 1 बाद 23 धावा केल्या असून अजून ते 474 धावांनी पिछाडीवर आहेत.

ऍशेसमध्ये सर्वाधिक वेळा एका डावात 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे क्रिकेटपटू – 

8 – डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)

4 – वॅली हॅमंड (इंग्लंड)

3 – स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)

2 – बॉब सिम्पसन (ऑस्ट्रेलिया)

2 – ऍलिस्टर कूक (इंग्लंड)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

तब्बल १२५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडून टिम पेनने केला असा मोठा कारनामा

स्टिव्ह स्मिथने मास्टर ब्लास्टर तेंडूलकरपेक्षा १५ डाव कमी खेळताना केला मोठा पराक्रम

‘या’ सामन्यानंतर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटटर मोहम्मद नबी होणार कसोटीतून निवृत्त

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/third-ashes-double-hundreds-for-steven-smith-only-bradman-8-and-hammond-4-have-got-more/feed/ 0 52548
तब्बल १२५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडून टिम पेनने केला असा मोठा कारनामा https://mahasports.co.in/tim-paine-50-now-becomes-the-only-third-captain-keeper-to-make-a-fifty-in-the-ashes/ https://mahasports.co.in/tim-paine-50-now-becomes-the-only-third-captain-keeper-to-make-a-fifty-in-the-ashes/#respond Fri, 06 Sep 2019 09:19:50 +0000 https://mahasports.co.in/?p=52544

मँचेस्टर। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या चौथ्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 8 बाद 497 धावांवर घोषित केला. या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने 211 धावांची द्विशतकी खेळी केली. तसेच कर्णधार टिम पेनने स्मिथबरोबर 145 धावांची भागीदारी करताना 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. पेनने या अर्धशतकी खेळीबरोबरच एक खास पराक्रम केला आहे. तो ऍशेस मालिकेत […]

www.mahasports.co.in

]]>

मँचेस्टर। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या चौथ्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 8 बाद 497 धावांवर घोषित केला. या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने 211 धावांची द्विशतकी खेळी केली. तसेच कर्णधार टिम पेनने स्मिथबरोबर 145 धावांची भागीदारी करताना 58 धावांची अर्धशतकी खेळी केली.

पेनने या अर्धशतकी खेळीबरोबरच एक खास पराक्रम केला आहे. तो ऍशेस मालिकेत अर्धशतक करणारा ऑस्ट्रेलियाचा दुसराच यष्टीरक्षक-कर्णधार ठरला आहे.

याआधी असा पराक्रम जॅक ब्लॅकहॅम यांनी डिसेंबर 1894 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून यष्टीरक्षणाबरोबरच कर्णधारपद सांभाळताना केला आहे. त्यांनी त्यावेळी सिडनी येथे 74 धावांची खेळी केली होती. त्यानंतर तब्बल 125 वर्षांनी पेनने ऑस्ट्रेलियाकडून असा पराक्रम केला आहे.

त्याचबरोबर पेन हा ऍशेस मालिकेत अर्धशतक करणारा एकूण तिसराच यष्टीरक्षक-कर्णधार आहे. ऍशेसमध्ये ब्लॅकहॅम यांच्यानंतर 1998 मध्ये इंग्लंडचे नेतृत्व करताना यष्टीरक्षक ऍलेक स्टिवर्ट यांनी ऍडलेड येथे नाबाद 63 धावांची खेळी केला होती.

सध्या सुरु असलेल्या 2019 ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात 1 बाद 23 धावा केल्या असून अजून ते 474 धावांनी पिछाडीवर आहेत.

ऍशेसमध्ये यष्टीरक्षक-कर्णधार म्हणून अर्धशतक करणारे क्रिकेटपटू – 

जॅक ब्लॅकहॅम (ऑस्ट्रेलिया) -74 धावा, सिडनी – डिसेंबर 1894

ऍलेक स्टिवर्ट (इंग्लंड) – 63* धावा, ऍडलेड – डिसेंबर 1998

टिम पेन (ऑस्ट्रेलिया) – 58 धावा, मँचेस्टर –  सप्टेंबर 2019

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

स्टिव्ह स्मिथने मास्टर ब्लास्टर तेंडूलकरपेक्षा १५ डाव कमी खेळताना केला मोठा पराक्रम

‘या’ सामन्यानंतर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटटर मोहम्मद नबी होणार कसोटीतून निवृत्त

टॉप ५: इंग्लंड विरुद्ध केलेल्या शानदार शतकी खेळीबरोबर स्टिव्ह स्मिथने केले हे खास ५ विक्रम

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/tim-paine-50-now-becomes-the-only-third-captain-keeper-to-make-a-fifty-in-the-ashes/feed/ 0 52544
स्टिव्ह स्मिथने मास्टर ब्लास्टर तेंडूलकरपेक्षा १५ डाव कमी खेळताना केला मोठा पराक्रम https://mahasports.co.in/steve-smith-overtakes-sachin-tendulkar-in-illustrious-list-with-26th-test-century/ https://mahasports.co.in/steve-smith-overtakes-sachin-tendulkar-in-illustrious-list-with-26th-test-century/#respond Fri, 06 Sep 2019 08:39:17 +0000 https://mahasports.co.in/?p=52540

मँचेस्टर। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या चौथ्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 8 बाद 497 धावांवर घोषित केला. त्यांच्याकडून स्टिव्ह स्मिथने द्विशतकी खेळी केली. स्मिथने या सामन्यात 319 चेंडूत 211 धावा केल्या. या खेळीत त्याने 24 चौकार आणि 2 षटकार मारले. स्मिथचे हे कसोटी कारकिर्दीतील 26 वे शतक आहे. त्याने हे शतक कसोटी कारकिर्दीतील […]

www.mahasports.co.in

]]>

मँचेस्टर। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या चौथ्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 8 बाद 497 धावांवर घोषित केला. त्यांच्याकडून स्टिव्ह स्मिथने द्विशतकी खेळी केली.

स्मिथने या सामन्यात 319 चेंडूत 211 धावा केल्या. या खेळीत त्याने 24 चौकार आणि 2 षटकार मारले. स्मिथचे हे कसोटी कारकिर्दीतील 26 वे शतक आहे.

त्याने हे शतक कसोटी कारकिर्दीतील 121 व्या डावात केले आहे. त्यामुळे तो कसोटीमध्ये सर्वात जलद 26 शतके करण्याच्या यादीत डॉन ब्रॅडमननंतर दुसऱ्या स्थानावर आला आहे.

तसेच त्याने या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 51 शतके करणाऱ्या सचिनने कारकिर्दीतील 26 वे कसोटी शतक 136 व्या डावात केले होते. पण त्याच्यापेक्षा आता 15 डाव कमी खेळत स्मिथने कसोटीत 26 शतके करण्याचा पराक्रम केला आहे.

कसोटीत सर्वात जलद 26 शतके करण्याचा विक्रम ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी केवळ 69 डावात हा पराक्रम केला होता.

सध्या सुरु असलेल्या 2019 ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात 1 बाद 23 धावा केल्या असून अजून ते 474 धावांनी पिछाडीवर आहेत.

#सर्वात जलद 26 वे कसोटी शतक करणारे क्रिकेटपटू – 

69 डाव – डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)

121 डाव – स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)

136 डाव – सचिन तेंडूलकर (भारत)

144 डाव – सुनील गावस्कर (भारत)

145 डाव – मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘या’ सामन्यानंतर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटटर मोहम्मद नबी होणार कसोटीतून निवृत्त

टॉप ५: इंग्लंड विरुद्ध केलेल्या शानदार शतकी खेळीबरोबर स्टिव्ह स्मिथने केले हे खास ५ विक्रम

संपूर्ण यादी: या खेळाडूंनी आपल्या संघांसाठी झळकावले आहे पहिले वहिले कसोटी शतक

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/steve-smith-overtakes-sachin-tendulkar-in-illustrious-list-with-26th-test-century/feed/ 0 52540
‘या’ सामन्यानंतर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटटर मोहम्मद नबी होणार कसोटीतून निवृत्त https://mahasports.co.in/mohammad-nabi-set-to-retire-from-test-cricket-after-one-off-match-against-bangladesh/ https://mahasports.co.in/mohammad-nabi-set-to-retire-from-test-cricket-after-one-off-match-against-bangladesh/#respond Fri, 06 Sep 2019 07:35:03 +0000 https://mahasports.co.in/?p=52537

अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद नबी सध्या सुरु असलेल्या बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघातील कसोटी सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबद्दल अफगाणिस्तानचे व्यवस्थापक नाझिम जार अब्दुररहिमझाई यांनी माहिती दिली आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार नाझिम जार म्हणाले, ‘हो, नबी सध्या चालू असलेल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती घेणार आहे.’ असे असले तरी अजून नबीने याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही. […]

www.mahasports.co.in

]]>

अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद नबी सध्या सुरु असलेल्या बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघातील कसोटी सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबद्दल अफगाणिस्तानचे व्यवस्थापक नाझिम जार अब्दुररहिमझाई यांनी माहिती दिली आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार नाझिम जार म्हणाले, ‘हो, नबी सध्या चालू असलेल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती घेणार आहे.’ असे असले तरी अजून नबीने याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही.

त्याचबरोबर तो कसोटीतून निवृत्तीचा निर्णय मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेत असल्याची शक्यता आहे.

सध्या बांगलादेश विरुद्ध सुरु असलेला कसोटी सामना हा नबीचा कसोटी कारकिर्दीतील तिसराच सामना आहे. या सामन्यात त्याला पहिल्या डावात खास काही करता आलेले नाही. तो शून्य धावेवर बाद झाला.

त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 3 कसोटीतील 5 डावात फलंदाजी करताना 25 धावाच केल्या आहेत. तसेच 4 विकेट्स घेतल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

टॉप ५: इंग्लंड विरुद्ध केलेल्या शानदार शतकी खेळीबरोबर स्टिव्ह स्मिथने केले हे खास ५ विक्रम

संपूर्ण यादी: या खेळाडूंनी आपल्या संघांसाठी झळकावले आहे पहिले वहिले कसोटी शतक

अफगाणिस्तानला मिळाला कसोटी क्रिकेटमधील पहिला शतकवीर!

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/mohammad-nabi-set-to-retire-from-test-cricket-after-one-off-match-against-bangladesh/feed/ 0 52537
टॉप ५: इंग्लंड विरुद्ध केलेल्या शानदार शतकी खेळीबरोबर स्टिव्ह स्मिथने केले हे खास ५ विक्रम https://mahasports.co.in/steve-smith-5-records-in-4th-ashes-test/ https://mahasports.co.in/steve-smith-5-records-in-4th-ashes-test/#respond Thu, 05 Sep 2019 12:58:30 +0000 https://mahasports.co.in/?p=52533

कालपासून(4 सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा ऍशेस कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज(5 सप्टेंबर) दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्राअखेर पहिल्या डावात 5 बाद 245 धावा केल्या आहेत. या डावात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी केली आहे. त्याने आज पहिल्या सत्राअखेरपर्यंत 11 चौकारांसह 163 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या आहेत. हे […]

www.mahasports.co.in

]]>

कालपासून(4 सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा ऍशेस कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज(5 सप्टेंबर) दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्राअखेर पहिल्या डावात 5 बाद 245 धावा केल्या आहेत.

या डावात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी केली आहे. त्याने आज पहिल्या सत्राअखेरपर्यंत 11 चौकारांसह 163 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या आहेत. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 26 वे शतक आहे. याबरोबरच त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

त्याने या शतकी खेळीबरोबरच केलेले हे खास विक्रम – 

#सर्वात जलद 26 वे कसोटी शतक करणारे क्रिकेटपटू – 

69 डाव – डॉन ब्रॅडमन

121 डाव – स्टिव्ह स्मिथ

136 डाव – सचिन तेंडूलकर

#इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणारे क्रिकेटपटू – 

19 शतके – डॉन ब्रॅडमन

11 शतके – स्टिव्ह स्मिथ

10 शतके – गॅरी सोबर्स

10 शतके – स्टिव्ह वॉ

9 शतके – ग्रेग चॅपेल

#एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू – 

19 शतके – डॉन ब्रॅडमन विरुद्ध इंग्लंड

13 शतके – सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडीज

12 शतके – जॅक हॉब्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया

11 शतके – स्टिव्ह स्मिथ विरुद्ध इंग्लंड

11 शतके – सचिन तेंडूलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया

#ऍशेसमध्ये सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू –

19 शतके – डॉन ब्रॅडमन

12 शतके – जॅक हॉब्स

11 शतके – स्टिव्ह स्मिथ

10 शतके – स्टिव्ह वॉ

#एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा तीन किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारे क्रिकेटपटू –

5 वेळा – डॉन ब्रॅडमन

5 वेळा – गॅरी सोबर्स

4 वेळा – जॅक कॅलिस

4 वेळा – स्टिव्ह स्मिथ

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

संपूर्ण यादी: या खेळाडूंनी आपल्या संघांसाठी झळकावले आहे पहिले वहिले कसोटी शतक

अफगाणिस्तानला मिळाला कसोटी क्रिकेटमधील पहिला शतकवीर!

जेव्हा स्टिव्ह स्मिथ क्रिकेटच्या चेंडूवरच नाही तर बीच बॉलवरही मारतो चौकार, पहा व्हिडिओ

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/steve-smith-5-records-in-4th-ashes-test/feed/ 0 52533