फुटबॉल – Maha Sports https://mahasports.co.in India's first Marathi Sports News Website Wed, 24 Jul 2019 11:41:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.2.3 https://mahasports.co.in/wp-content/uploads/2018/06/cropped-Maha-Sports-Fav-Icon-32x32.png फुटबॉल – Maha Sports https://mahasports.co.in 32 32 125942317 एका इन्स्टाग्राम पोस्टचे विराट कोहलीला मिळतात एवढे कोटी, ऐकून व्हाल थक्क! https://mahasports.co.in/virat-kohli-only-cricketer-in-instagram-top-10-rich-list-for-sportspersons/ https://mahasports.co.in/virat-kohli-only-cricketer-in-instagram-top-10-rich-list-for-sportspersons/#respond Wed, 24 Jul 2019 11:41:10 +0000 https://mahasports.co.in/?p=51096

भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात जसे नव-नवे विक्रम करत असतो. तसेच तो मैदानाबाहेरही करत आहे. तो नुकताच इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. इन्स्‍टाग्राम शेड्यूलिंग टूल होपर एचक्‍यू के च्या नुसार विराट हा इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 9 व्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या 10 मध्ये तो एकमेव क्रिकेटपटू […]

www.mahasports.co.in

]]>

भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात जसे नव-नवे विक्रम करत असतो. तसेच तो मैदानाबाहेरही करत आहे. तो नुकताच इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू ठरला आहे.

इन्स्‍टाग्राम शेड्यूलिंग टूल होपर एचक्‍यू के च्या नुसार विराट हा इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 9 व्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या 10 मध्ये तो एकमेव क्रिकेटपटू आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझिलचा फुटबॉलपटू नेमार ज्यूनियर आहे. तसेच तिसऱ्या स्थानी अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनल मेस्सी आहे.

क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात भारताचे नेतृत्व करणारा विराट एका इन्स्टाग्राम पोस्टमधून 1 लाख 96 हजार यूएस डॉलर्स(साधारण 1 कोटी 35 लाख 66 हजार रुपये) इतकी कमाई करतो. विराटला सोशल मीडियावर जवळ जवळ 38 मिलियन (3 कोटी 80 लाख) फॉलोअर्स आहेत. तो सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

विराटने नुकतेच 2019 विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले असून त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उपांत्यफेरीपर्यंत धडक मारली होती. उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. आता विराट पुढील महिन्यात होणाऱ्या विंडीज दौऱ्यात खेळणार आहे.

इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर असणारा रोनाल्डो हा एका पोस्टमधून 9 लाख 75 कोटी यूएस डॉलर्स( साधारण 6 कोटी 73 लाख 49 हजार रुपये) इतकी कमाई करतो.

इन्स्टाग्राममधून सर्वाधिक कमाई करणारे पहिले 10 खेळाडू

ख्रिस्तियानो रोनाल्डो (फुटबॉल): $ 9,75,000

नेमार (फुटबॉल): $ 7,22,000

लिओनल मेसी (फुटबॉल): $ 6,48,000

डेव्हिड बेकहॅम (फुटबॉल): $ 3,57,000

लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल): $ 2,72,000

रोनाल्डिन्हो (फुटबॉल): $ 2,56,000

गॅरेथ बेल (फुटबॉल): $ 2,18,000

झ्लाटन इब्राहिमोव्हिक (फुटबॉल): $ 2,00,000

विराट कोहली (क्रिकेट): $ 1,96,000 

लुईस सुअरेझ (फुटबॉल): $ 1,84,000

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

या दोन खेळाडूंना वनडे संघात संधी न मिळाल्याने सौरव गांगुलीने व्यक्त केले आश्चर्य

भारताचा माजी कर्णधार म्हणतो, ‘…तर धोनी अजूनही खेळू शकतो क्रिकेट’

पंत, अय्यर, गिल सारख्या युवा खेळाडूंबद्दल कर्णधार विराट कोहली म्हणाला…

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/virat-kohli-only-cricketer-in-instagram-top-10-rich-list-for-sportspersons/feed/ 0 51096
धोनीच्या टीकाकारांना दिग्गज भारतीय फुटबॉलपटू बायचूंग भुतियाने दिले सडेतोड उत्तर https://mahasports.co.in/former-india-footballer-baichung-bhutia-backs-ms-dhoni-calls-him-brilliant/ https://mahasports.co.in/former-india-footballer-baichung-bhutia-backs-ms-dhoni-calls-him-brilliant/#respond Fri, 05 Jul 2019 11:56:57 +0000 https://mahasports.co.in/?p=50402

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी मागील अनेक दिवसांपासून त्याच्या फलंदाजीतील कामगिरीमुळे मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरे जात आहे. पण भारताचा दिग्गज माजी फुटबॉलपटू बायचूंग भुतियाने धोनीचे समर्थन केले आहे. भुतिया धोनीबद्दल म्हणाला, ‘मला वाटते तो शानदार आहे. लोक त्याची टीका करत आहेत. कारण ते फक्त बळीचा बकरा शोधत आहेत. पण जर तूम्ही विश्वचषक नीट पाहिला तर […]

www.mahasports.co.in

]]>

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी मागील अनेक दिवसांपासून त्याच्या फलंदाजीतील कामगिरीमुळे मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरे जात आहे. पण भारताचा दिग्गज माजी फुटबॉलपटू बायचूंग भुतियाने धोनीचे समर्थन केले आहे.

भुतिया धोनीबद्दल म्हणाला, ‘मला वाटते तो शानदार आहे. लोक त्याची टीका करत आहेत. कारण ते फक्त बळीचा बकरा शोधत आहेत. पण जर तूम्ही विश्वचषक नीट पाहिला तर मला वाटते त्याने चांगला खेळ केला आहे.’

याबरोबरच भुतियाने म्हटले आहे की चालू क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी जागतिक अपीलची कमतरता आहे. तसेच त्याने या विश्वचषकाला ‘दक्षिण आशिया कप’ असे देखील संबोधले आहे.

या विश्वचषकात सहभागी झालेल्या विश्वचषकात 10 पैकी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे पाच संघ आशिया खंडातील आहेत. पण यांच्यातील फक्त भारताला उपांत्यफेरीत प्रवेश करण्यात यश आले आहे.

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार भुतिया म्हणाला, ‘मला वाटते हा विश्वचषक पूर्णपणे दक्षिण आशिया कप आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये तूम्ही कदाचीत भूतान आणि नेपाळ या आशिया संघांनाही पात्र ठरलेले पाहू शकता.’

तसेच भुतियाने उपहासात्मक प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ‘जर आपण तीन अजून संघ पाठवले तरी ते संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत हा विश्वचषक सहज जिंकेल.’

तो पुढे म्हणाला, ‘विश्वचषकातून ‘विश्व’ हा शब्द हरवल्यासारखा वाटत आहे. युरोपमधून फक्त एक देश खेळत आहे. तसेत आफ्रिकेतूनही एक देश खेळत आहे. पूर्वी झिम्बाब्वे होता.’

‘विंडीजकडे बघून वाटते की ते काही वर्षांनी ते क्रिकेट खेळणे थांबवतील. दक्षिण आफ्रिकेबाबत सांगायचे झाले तर असे वाटत आहे त्यांच्या युवा पिढीने क्रिकेट खेळणे थांबवले आहे. तिथे बास्केटबॉल आणि फुटबॉलला अधिक महत्त्व मिळवित आहेत.’

भुतियाने आयसीसीला खेळाचा प्रसार करण्यासाठी गंभीर प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. तो म्हणाला, ‘विविध देशांमध्ये क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी आयसीसीने गंभीर प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. ही फक्त 10 देशांपूरते मर्यादीत नाही. ते खेळाचा प्रसार करण्यासाठी गंभीर प्रयत्न करताना दिसत नाही.’

‘जर त्यांनी असे केले नाही तर मला वाटते पुढील काही वर्षात भारत, श्रीलंका आणि बांगलादेश हेच संघ असतील आणि नेपाळ, भुतान हे देखील पात्र होतील.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

फॅबिएन ऍलेनने एक हाती जबरदस्त झेल घेत सर्वांनाच केले थक्क, पहा व्हिडिओ

अफगाणिस्तानच्या १८ वर्षीय इक्रम अली खीलने मोडला सचिन तेंडुलकरचा २७ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम

सेमीफायनल आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; हा खेळाडू विश्वचषकातून बाहेर

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/former-india-footballer-baichung-bhutia-backs-ms-dhoni-calls-him-brilliant/feed/ 0 50402
आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत एमआयटी मॅनेटला सर्वाधिक पदके https://mahasports.co.in/mit-manet-top-at-the-medal-taly-in-in-intercollegiate-competition/ https://mahasports.co.in/mit-manet-top-at-the-medal-taly-in-in-intercollegiate-competition/#respond Tue, 04 Jun 2019 14:22:30 +0000 https://mahasports.co.in/?p=49122

पुणे। एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोरतर्फे नुकत्यातच पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत एमआयटी महाराष्ट्र अकॉडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन ॲन्ड ट्रेनिंग संघाने (मॅनेट) सर्वाधिक पदके जिंकत पहिला क्रमांक पटकावला. एमआयटी इन्स्टीट्यूट ऑफ डिझाईन आणि एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग संघाला अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, […]

www.mahasports.co.in

]]>

पुणे। एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोरतर्फे नुकत्यातच पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत एमआयटी महाराष्ट्र अकॉडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन ॲन्ड ट्रेनिंग संघाने (मॅनेट) सर्वाधिक पदके जिंकत पहिला क्रमांक पटकावला. एमआयटी इन्स्टीट्यूट ऑफ डिझाईन आणि एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग संघाला अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोरतर्फे विद्यापीठाच्या मैदानावर विविध प्रकारचे खेळ नुकतेच खेळविण्यात आले. यात बॉस्केटबॉल, क्रिकेट (पुरुष),व्हॉलिबॉल (पुरुष-महिला), टेनिस (पुरुष-महिला), बॅडमिंटन (पुरुष-महिला), बुद्धीबळ (पुरुष-महिला), टेबल टेनिस (पुरुष-महिला), कब्बडी (पुरुष), फुटबॉल (पुरुष), रोईंग (पुरुष-महिला), जलतरण (पुरुष-महिला), क्रॉस कंट्री (पुरुष – महिला) या खेळांचा समावेश होता.

या सर्व खेळ प्रकारात एमआयटी मॅनेट संघाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले. या संघाने एकूण १२ सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले. यात बॉस्केटबॉल, क्रिकेट (पुरुष), व्हॉलिबॉल (पुरुष), बॅडमिंटन (पुरुष), टेबल टेनिस (पुरुष), कब्बडी (पुरुष), फुटबॉल (पुरुष), रोईंग (पुरुष-महिला), जलतरण (पुरुष), क्रॉस कंट्री (पुरुष – महिला) प्रकारात सुवर्ण, तर बुद्धीबळ (पुरुष) प्रकारात रौप्य पदक जिंकले.

एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग संघाने बुद्धीबळमध्ये सुवर्ण, तर बास्केटबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस (पुरुष), कब्बडी (पुरुष), फुटबॉल (पुरुष), रोईंग (पुरुष ), क्रॉस कंट्री (पुरुष) प्रकारात रौप्य पदक जिंकले. एमआयटी इन्स्टीट्यूट ऑफ डिझाईन संघाने टेनिस (पुरुष), बॅडमिंटन (महिला) आणि जलतरण (महिला) प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. बॅडमिंटन (पुरुष), जलतरण (पुरुष) प्रकारात रौप्य पदक जिंकले.

एमआयटी कॉलेज ऑफ फुड अन्ड टेक्नॉलॉजी संघाने बुद्धीबळ (महिला) प्रकारात सुवर्ण, तर व्हॉलीबॉल (पुरुष), रोईंग (महिला) संघाने रौप्य पदक जिंकले. एमआयटी स्कूल ऑफ फाईन आर्ट संघाने जलतरण (महिला) प्रकारात रौप्य, एमआयटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने बुद्धीबळ (महिला) संघाने रौप्य, एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंग संघाने टेनिस (पुरुष) व बॅडमिंटन (महिला) संघाने रौप्य पदक जिंकले.

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/mit-manet-top-at-the-medal-taly-in-in-intercollegiate-competition/feed/ 0 49122
या दिग्गज फुटबॉलपटूने भारताची जर्सी घालून कर्णधार कोहलीला दिल्या विश्वचषकासाठी खास शुभेच्छा https://mahasports.co.in/german-football-star-thomas-muller-posts-special-message-of-virat-kohli-and-team-for-worldcup-2019/ https://mahasports.co.in/german-football-star-thomas-muller-posts-special-message-of-virat-kohli-and-team-for-worldcup-2019/#respond Tue, 04 Jun 2019 11:32:38 +0000 https://mahasports.co.in/?p=49104

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात भारताचा पहिला सामना उद्या(5जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साउथँम्पटन येथे होणार आहे. या विश्वचषकासाठी विराट कोहली आणि भारतीय संघाला फुटबॉल जगतातील अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यात आता फिफा विश्वचषक विजेता जर्मनीचा फुटबॉलपटू थॉमस म्यूलरचाही समावेश झाला आहे. त्याने सोशल मीडियातून विराट आणि भारतीय संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या […]

www.mahasports.co.in

]]>

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात भारताचा पहिला सामना उद्या(5जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साउथँम्पटन येथे होणार आहे. या विश्वचषकासाठी विराट कोहली आणि भारतीय संघाला फुटबॉल जगतातील अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

यात आता फिफा विश्वचषक विजेता जर्मनीचा फुटबॉलपटू थॉमस म्यूलरचाही समावेश झाला आहे. त्याने सोशल मीडियातून विराट आणि भारतीय संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

29 वर्षीय म्यूलरने ट्विट केले आहे की ‘विश्वचषक 2019 साठी सर्व सहभागी संघांना रोमांचकारी सामन्यांसाठी शुभेच्छा. विशेषत: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी मी शुभेच्छा देतो. तो जर्मनी संघाचा चाहता आहे आणि मागे अनेकदा त्याने जर्मनी संघाला पाठिंबा दिला आहे.’

या ट्विटबरोबरच म्यूलरने भारतीय संघाची जर्सी घातलेला आणि बॅट हातात घेतलेला एक फोटोही शेअर केला आहे. त्याच्या या ट्विटवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

म्यूलरच्या आधी भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषकासाठी भीरतीय फुटबॉल पुरुष आणि महिला संघाच्या खेळाडूंनी तसेच ब्राझिल आणि चेल्सीचा डिफेंडर डेव्हिड लुईज तर इंग्लंड आणि टॉटेनहॅम हॉटस्परचा स्ट्रायकर हॅरि केन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय फुटबॉल संघाने दिल्या भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा-

हॅरि केनने घेतली विराट कोहलीची भेट – 

डेव्हिड लुईजने दिल्या भारतीय संघाला शुभेच्छा – 

म्यूलरच्या ट्विटवर आलेल्या चाहत्यांच्या काही प्रतिक्रिया –

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषक २०१९: किंग कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे दोन मोठे पराक्रम करण्याची सुवर्णसंधी

विश्वचषक २०१९: खेळाडूने नाही तर चक्क फोटोग्राफरने घेतला एका हाताने अफलातून झेल, पहा व्हिडिओ

विश्वचषक २०१९: टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार, जाणून घ्या कारण

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/german-football-star-thomas-muller-posts-special-message-of-virat-kohli-and-team-for-worldcup-2019/feed/ 0 49104
विराट कोहलीच्या टीम इंडियाला भारतीय फुटबॉल संघाकडून खास शुभेच्छा, पहा व्हिडिओ https://mahasports.co.in/indian-football-team-wish-team-india-all-the-best-for-the-icc-world-cup/ https://mahasports.co.in/indian-football-team-wish-team-india-all-the-best-for-the-icc-world-cup/#respond Mon, 03 Jun 2019 13:24:28 +0000 https://mahasports.co.in/?p=49072

इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या 12 वी आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 5 जूनला साउथँम्पटन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे. या विश्वचषकासाठी विराट कोहली कर्णधार असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला भारतीय फुटबॉल संघाकडून एका खास व्हिडिओतून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या व्हिडिओतून भारतीय फुटबॉल पुरुष संघाचा कर्णधार सुनिल […]

www.mahasports.co.in

]]>

इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या 12 वी आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 5 जूनला साउथँम्पटन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे.

या विश्वचषकासाठी विराट कोहली कर्णधार असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला भारतीय फुटबॉल संघाकडून एका खास व्हिडिओतून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

या व्हिडिओतून भारतीय फुटबॉल पुरुष संघाचा कर्णधार सुनिल छेत्री, अनुभवी डिफेंडर संदेश झींगन, गोलकिपर गुरप्रीत सिंग संधू यांनी तर भारतीय फुटबॉल महिला संघाच्या दलिमा छिब्बर आणि गोलकिपर अदिती चौहान यांनी भारताच्या क्रिकेट संघाला 2019 विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या शुभेच्छा देताना झींगन म्हणाला, ‘विश्वचषकासाठी आपल्या भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा. मला खात्री आहे तूम्ही खूप चांगले खेळाल आणि विजेतेपद मायदेशी घेऊन याल.’

तसेच गुरप्रीत सिंग म्हणाला, ‘मी तूम्हाला शुभेच्छा देतो. आम्हाला खात्री आहे तूम्ही आपल्यासाठी हे विजेतेपद मिळवाल. मनापासून खेळा आणि विश्वचषक मायदेशी आणा.’

विराटबरोबर चांगली मैत्री असणारा कर्णधार छेत्री म्हणाला, ‘विराट तूला आणि संपूर्ण संघाला शुभेच्छा. आम्ही तूमचाच भाग आहोत. चांगले खेळा. दुखापतीपासून लांब रहा आणि विश्वचषकाची मजा घ्या.’

त्याचबरोबर भारतीय फुटबॉलच्या महिला संघातील दलिमा आणि अदिती यांनीही भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना विश्वचषक मायदेशी आणा, असा संदेश दिला आहे.

भारतीय फुटबॉल संघ किंग्स कप स्पर्धेत खेळण्यासाठी सध्या थायलंड दौऱ्यावर आहे. त्यांचा पहिला सामना 5 जूनला कुराकाओ विरुद्ध होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाचा हा खेळाडू झाला फिट, पण खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह

…म्हणून विराट कोहलीने २०१७नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणे सोडले

विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका, भारताविरुद्ध खेळणार नाही हा मोठा खेळाडू

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/indian-football-team-wish-team-india-all-the-best-for-the-icc-world-cup/feed/ 0 49072
Video: चेल्सीच्या स्टार फुटबॉलपटूने विराट कोहलीच्या टीम इंडियाला दिल्या खास शुभेच्छा https://mahasports.co.in/chelsea-star-wishes-team-india-and-virat-kohli-luck/ https://mahasports.co.in/chelsea-star-wishes-team-india-and-virat-kohli-luck/#respond Mon, 27 May 2019 14:38:44 +0000 https://mahasports.co.in/?p=48700

ब्राझील फुटबॉल संघाचा माजी कर्णधार आणि चेल्सीचा बचावपटू डेव्हिड लुईजने सोमवारी भारतीय संघाला आणि कर्णधार विराट कोहलीला आगामी विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवरुन शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओद्वारा लूईजने विराट कर्णधार असलेल्या भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. लूईजने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की ‘हॅलो, विराट कोहली. विश्वचषकासाठी तूला शुभेच्छा. देवाचा अशिर्वाद तूझ्याबरोबर आणि तूझ्या संघाबरोबर […]

www.mahasports.co.in

]]>

ब्राझील फुटबॉल संघाचा माजी कर्णधार आणि चेल्सीचा बचावपटू डेव्हिड लुईजने सोमवारी भारतीय संघाला आणि कर्णधार विराट कोहलीला आगामी विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विटरवरुन शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओद्वारा लूईजने विराट कर्णधार असलेल्या भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. लूईजने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की ‘हॅलो, विराट कोहली. विश्वचषकासाठी तूला शुभेच्छा. देवाचा अशिर्वाद तूझ्याबरोबर आणि तूझ्या संघाबरोबर असो. मी तूला पाठिंबा देत आहे. लवकरच भेटू.’

32 वर्षीय लूईज हा या आठवड्यात युरोपा लीगच्या अंतिम सामन्यात अर्सेनलविरुद्ध मैदानात उतरणार आहे. त्याने विराटसह पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू इमाद वासिमलाही शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याने वासिमला शुभेच्छा देताना म्हटले आहे की ‘इमाद वासिम तूला विश्वचषकासाठी शुभेच्छा. तू चांगला खेळाडू आहेस. आशा आहे की तूम्ही जिंकाल आणि स्पर्धेची मजा घ्याल.

इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरि केननेही घेतली विराटची भेट – 

काही दिवसांपूर्वी  इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरि केनने विराटची भेट घेतली होती. या भेटीदरम्यानचा या दोघांचा फोटो केनने सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे. त्याचबरोबर त्याने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की ‘मागील काही वर्षांतील अनेक ट्विट्सनंतर अखेर विराटला भेटलो. तो चांगला व्यक्ती असून शानदार खेळाडू आहे.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

‘यूनिवर्स बॉस’ गेलने या दिग्गज खेळाडूला केले २०२३ चा विश्वचषक खेळण्यासाठी प्रभावित…

एका विश्वचषकात या संघाने केले आहेत सर्वाधिक शतके, टीम इंडिया आहे या स्थानावर

या दिग्गज क्रिकेटपटूच्या निधनाची पसरली खोटी बातमी; स्वत: क्रिकेटपटूने केला खूलासा

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/chelsea-star-wishes-team-india-and-virat-kohli-luck/feed/ 0 48700
ब्लॅकबर्नमधील प्रशिक्षणाचा अनिकेतला फायदाच होईल, ब्लॅकबनर रोव्हर्सचे प्रिशक्षक टोनी मानब्रे यांना विश्वास https://mahasports.co.in/i-am-sure-the-training-in-blackburn-rovers-academy-will-help-aniket-jadhav-tony-mowbray/ https://mahasports.co.in/i-am-sure-the-training-in-blackburn-rovers-academy-will-help-aniket-jadhav-tony-mowbray/#respond Sat, 25 May 2019 14:23:19 +0000 https://mahasports.co.in/?p=48627

पुणे। युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव गुणवान आहे. त्याच्यातील गुणवत्तेला ब्लॅकबर्न अॅकॅडमीतील प्रशिक्षणाने पैलूच पडतील आणि त्याला भविष्याच्या दृष्टिने फायदाच होईल, असे मत ब्लॅकर्न रोव्हर्सचे मुख्य प्रशिक्षक टोनी मावब्रे यांनी येथे व्यक्त केले. अनिकेत हा इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरला आहे. तीन महिन्याच्या कालावधीसाठी १८ वर्षीय अनिकेत मार्चमध्येच रोव्हर्स अकादमीत दाखल झाला आहे. त्याच्या […]

www.mahasports.co.in

]]>

पुणे। युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव गुणवान आहे. त्याच्यातील गुणवत्तेला ब्लॅकबर्न अॅकॅडमीतील प्रशिक्षणाने पैलूच पडतील आणि त्याला भविष्याच्या दृष्टिने फायदाच होईल, असे मत ब्लॅकर्न रोव्हर्सचे मुख्य प्रशिक्षक टोनी मावब्रे यांनी येथे व्यक्त केले.

अनिकेत हा इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरला आहे. तीन महिन्याच्या कालावधीसाठी १८ वर्षीय अनिकेत मार्चमध्येच रोव्हर्स अकादमीत दाखल झाला आहे. त्याच्या खेळाचा विकास होण्याच्या दृष्टिने त्याला यंदाच्या मोसमातील स्वानसीविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्याच्या सरावासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मुख्य संघाबरोबर राहण्याचा अनुभव देखिल त्याला खूप काही शिकवून जाईल, असे सांगून मावब्रे म्हणाले, “विजेतेपदाची लढत खेळणाऱ्या संघातील खेळाडूंबरोबर सराव केल्यामुळे त्याला फायदा होईल. अकादमीतील तो सर्वात युवा खेळाडू असला, तरी त्याचा खेळाचा पाया भक्कम आहे. त्याच्याकडे कमालीची उत्सुकता आणि नवे शिकण्याची वृत्ती आहे. तो कठोर मेहनत तर घेतोच आहे, पण, बरोबरीने खेळाचा आनंदही लुटत आहे.”

त्याच्यातील अभ्यास करण्याच्या प्रवृत्तीने मावब्रे यांना प्रभावित केले. ते म्हणाले, “अकादमीतील रोजच्या प्रशिक्षणाने त्याच्यातील फुटबॉलपटू अधिक प्रगल्भ होईल. जेव्हा तो पहिल्यांदा क्लबमध्ये सरावासाठी आला तेव्हाच मला याच्यातील गुणवत्तेची ओळख झाली. तु जर रोज आमच्याकडे प्रशिक्षणासाठी आलास, तर तुला माझ्याकडून त्याला पाहिजे ते देईन असे त्याला सांगितले. यामुळे तो देखिल प्रभावित झाला. व्यावसायिक पातळीवरील प्रशिक्षणाने त्याचा पाया आणखी भक्कम होईल. त्याच्या फुटबॉलमधील कौशल्याची पाळेमुळे इतकी घट्ट होतील की येथील प्रशिक्षण त्याच्या कारकिर्दीला भक्कमपणा देणारे ठरेल.”

एका चांगल्या फुटबॉलपटूची व्याख्या करताना ते म्हणाले,” फुटबॉलची चांगली माहिती असणे आवश्यक आहे. चेंडू कसा खेळवायचा आणि पास देताना किती वजन वापरायचे या शिकण्याच्या गोष्टी आहेत. त्याला प्रशिक्षकाच्या भाषेत पायाभरणी म्हणता येईल. मुलभूत पुटबॉल कौशल्य ज्या सर्वेात्तम खेळाडूकडे आहे, ते खेळाडू देखिल अशाच पद्धतीने आपला खेळ उंचावतात. फरत इतकाच असतो की ते या सर्व गोष्टी अगदी नैसर्गिकरित्या करत असतात.”

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/i-am-sure-the-training-in-blackburn-rovers-academy-will-help-aniket-jadhav-tony-mowbray/feed/ 0 48627
जेव्हा क्रिकेट-फुटबॉलमधील दोन दिग्गज भेटतात एकमेंकांना… https://mahasports.co.in/virat-kohli-meets-harry-kane-in-london/ https://mahasports.co.in/virat-kohli-meets-harry-kane-in-london/#respond Sat, 25 May 2019 11:30:24 +0000 https://mahasports.co.in/?p=48601

इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून 2019 विश्वचषकाची स्पर्धा रंगणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला असून आज(25 मे) भारताचा न्यूझीलंड विरुद्ध सराव सामना रंगणार आहे. पण या सामन्याआधी इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरि केनने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची भेट घेतली आहे. या दोघांचा फोटो केनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर […]

www.mahasports.co.in

]]>

इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून 2019 विश्वचषकाची स्पर्धा रंगणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला असून आज(25 मे) भारताचा न्यूझीलंड विरुद्ध सराव सामना रंगणार आहे.

पण या सामन्याआधी इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरि केनने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची भेट घेतली आहे. या दोघांचा फोटो केनने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्याचबरोबर त्याने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की ‘मागील काही वर्षांतील अनेक ट्विट्सनंतर अखेर विराटला भेटलो. तो चांगला व्यक्ती असून शानदार खेळाडू आहे.’

यानंतर हाच फोटो विराटनेही शेअर करत म्हटले आहे की ‘तूला भेटून आनंद झाला. तूला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा.’

टोटेनहॅम हॉटस्पर क्लबचा खेळाडू असणारा केन हा यूईफए चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात लिव्हरपूल विरुद्ध 1 जूनला खेळण्यासाठी तयारी करत आहे. सध्या तो दुखापतीतून सावरत असून या अंतिम सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

याआधीही विराट आणि केन यांनी एकमेकांशी ट्विटरवरुन संवाद साधला आहे. मागीलवर्षी रशियामध्ये पार पडलेल्या फिफा विश्वचषकादरम्यान विराटने केनला शुभेच्छा देणारे ट्विट केले होते. यावर केननेही त्याला उत्तर देताना आभार मानले होते. या फिफा विश्वचषकात केन हा गोल्डन बुटचा मानकरीही ठरला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडच्या माजी कर्णधाराला अजूनही वाटते या दोन भारतीय क्रिकेटपटूंची भीती…

विश्वचषक २०१९: टीम इंडियाला धक्का; हा महत्त्वाचा खेळाडू झाला दुखापग्रस्त

या १० दिग्गज क्रिकेटपटूंना आजपर्यंत मिळवता आले नाही विश्वचषकाचे विजेतेपद

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/virat-kohli-meets-harry-kane-in-london/feed/ 0 48601
मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्कार जाहीर, सुहास जोशी, विनायक राणेंचा होणार सन्मान https://mahasports.co.in/mumbai-patrakar-sangh-vinayak-rane-suhas-joshi/ https://mahasports.co.in/mumbai-patrakar-sangh-vinayak-rane-suhas-joshi/#respond Tue, 14 May 2019 13:16:46 +0000 https://mahasports.co.in/?p=48357

मुंबई । गेल्या 35 वर्षांच्या क्रीडा पत्रकारितेत पाच हजारांपेक्षा अधिक लेख लिहणाऱया, अनेक उदयोन्मुख पत्रकारांसाठी द्रोणाचार्य ठरलेले दै. नवाकाळचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांची महेश बोभाटे क्रीडा पत्रकारिता तर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मरणार्थ दिल्dया जाणाऱया युवा क्रीडा पत्रकार पुरस्कारासाठी महाराष्ट्र टाइम्सचे क्रीडा पत्रकार विनायक राणे याची निवड करण्यात आल्dयाचे मुंबई मराठी […]

www.mahasports.co.in

]]>

मुंबई । गेल्या 35 वर्षांच्या क्रीडा पत्रकारितेत पाच हजारांपेक्षा अधिक लेख लिहणाऱया, अनेक उदयोन्मुख पत्रकारांसाठी द्रोणाचार्य ठरलेले दै. नवाकाळचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांची महेश बोभाटे क्रीडा पत्रकारिता तर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मरणार्थ दिल्dया जाणाऱया युवा क्रीडा पत्रकार पुरस्कारासाठी महाराष्ट्र टाइम्सचे क्रीडा पत्रकार विनायक राणे याची निवड करण्यात आल्dयाचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी जाहिर केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज आपल्dया दुसऱया क्रीडा पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. गेल्dया वर्षापासून महेश बोभाटे आणि आत्माराम मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या पुरस्कारांची सुरूवात करण्यात आली. यंदा महेश बोभाटे पुरस्कार ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार सुहास जोशींना जाहिर करण्यात आला. 1985 सालापासून क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात सुहास जोशी यांनी फार मोठे योगदान दिले आहे. सांज तरूण भारतपासून सुरू झालेली त्यांची क्रीडा कारकीर्द आजही त्याच उत्साहात सुरू आहे. गेल्dया 35 वर्षात त्यांची सांज तरूण भारत, मुंबई तरूण भारत आणि दै.नवाकाळ या दैनिकांत क्रीडा पत्रकारिता बहरली. या दीर्घ कारकीर्दीत त्यांनी विविध क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भारतभ्रमंती केली. 2005 साली त्यांनी संस्मरणीय असा युरोप अभ्यास दौराही केला.

अनेक ज्यूनियर पत्रकारांसाठी जोशी नेहमीच मार्गदर्शक ठरले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्dया लेखांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना, संघटकांना न्याय मिळवून दिलाय. अनेकांना मदत आणि रोजगार मिळवून देण्यात ते यशस्वी ठरलेत. त्यांनी आजवर दैनिकांसह अनेक साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके आणि दिवाळी अंकांमध्ये 5 हजारांपेक्षा अधिक लेख आणि मुलाखती प्रसिद्ध झाल्dया आहेत. त्याचबरोबर आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी बऱयाच क्रीडात्मक कार्यक्रमांचे सादरीकरणही केले आहे. त्यांच्या दीर्घ कारकीर्दीचा गौरव युआरएल, राज्य कबड्डी, श्री समर्थ व्यायाम मंदिर, राज्य कॅरम, उपनगर कबड्डी, विचारे प्रतिष्ठान या नामांकित संस्था-संघटनांनी क्रीडा पत्रकारिता पुरस्कार देऊन केला आहे.

तसेच दीड दशकांच्या कारकीर्दीत धडाडीची क्रीडा पत्रकारिता करणाऱया विनायक राणे याची आत्माराम मोरे क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विनायकने 2003 साली युवा सकाळमधून आपली क्रीडा पत्रकारिता सुरू केली आणि ती गेल्dया12 वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये धडाक्यात सुरू आहे. त्याने प्रो कबड्डी, चेन्नई ओपन, हॉकी विश्वचषक, युवा फिफा विश्वचषकासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वार्तांकन भारताच्या अनेक शहरांमध्ये जाऊन केलेय. गेल्dया वर्षापासून सुरू झालेल्या पहिल्या क्रीडा पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार विनायक दळवी आणि संदीप कदम हे होते.

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/mumbai-patrakar-sangh-vinayak-rane-suhas-joshi/feed/ 0 48357
आयएसएलच्या पाचव्या मोसमाचा संपुर्ण आढावा https://mahasports.co.in/hero-isl-5-the-season-that-was/ https://mahasports.co.in/hero-isl-5-the-season-that-was/#respond Tue, 19 Mar 2019 14:36:42 +0000 https://mahasports.co.in/?p=46457

मुंबई | हिरो इंडियन सुपर लिगचा (आयएसएल) पाचवा मोसम संपला आहे. बेंगळुरू एफसीने विजेतेपद मिळविले, तर गतविजेता चेन्नईयीन एफसी अखेरच्या क्रमांकावर फेकला गेला. सहभागी दहा संघांच्या कामगिरीचा आढावा ः   बेंगळुरू एफसी ः विजेतेपदाची क्षमता सिद्ध   गेल्या मोसमात अल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगळुरूने अंतिम फेरी गाठली. यावेळी कार्लेस कुआद्रात यांच्याकडे सुत्रे आल्यानंतर सरस कामगिरी अपेक्षित होती. […]

www.mahasports.co.in

]]>
मुंबई | हिरो इंडियन सुपर लिगचा (आयएसएल) पाचवा मोसम संपला आहे. बेंगळुरू एफसीने विजेतेपद मिळविले, तर गतविजेता चेन्नईयीन एफसी अखेरच्या क्रमांकावर फेकला गेला. सहभागी दहा संघांच्या कामगिरीचा आढावा ः
 
बेंगळुरू एफसी ः विजेतेपदाची क्षमता सिद्ध
 
गेल्या मोसमात अल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगळुरूने अंतिम फेरी गाठली. यावेळी कार्लेस कुआद्रात यांच्याकडे सुत्रे आल्यानंतर सरस कामगिरी अपेक्षित होती. त्यासाठी जेतेपदच आवश्यक होते. कुआद्रात यांनी मुळातच आकर्षक असलेली शैली आणखी पूरक बनविली. मैदानावर आणखी सकारात्मक खेळ करणारा संघ त्यांनी बांधला. संघभावना, लढाऊ वृत्ती आणि गुणवत्तेच्या जोरावर बेंगळुरूचा संघ बहरला. एफसी गोवाला हरवून त्यांनी थाटातच जेतेपद मिळविले.
 
एफसी गोवा ः आकर्षक व मनोरंजक खेळ
 
भारतीय फुटबॉलमध्ये गोव्याच्या संघांनी नेहमीच लौकीक निर्माण केला आहे. एफसी गोवाने दोन मोसमांच्या कालावधीत आपली खास शैली निर्माण केली. प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी नव्या मोसमासाठी बहुतांश खेळाडू कायम राखले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली  खेळाडूंनी स्पॅनीश शैली आत्मसात केली. ढिसाळ बचाव हीच मागील मोसमातील उणीव होती. त्यामुळे एफसी गोवाची पिछेहाट होत होती. लॉबेरा यांनी ही त्रुटी दूर केली. त्यासाठी मौर्तडा फॉल आणि कार्लोस पेना अशी जोडी जमविण्यात आली. मंदार राव देसाई याला लेफ्ट-बॅक बनविण्याचा धाडसी निर्णयही घेण्यात आला. ह्युगो बौमौस याला बदली खेळाडू म्हणून परिणामकारक पद्धतीने वापरण्यास चांगली फळे मिळाली. गोवा अंतिम फेरी कमी पडला असेल पण त्यांच्यासाठी हा मोसम संस्मरणीय ठरला.
 
मुंबई सिटी एफसी ः स्थिरावलेला संतुलीत संघ
 
मुंबईच्या बाद फेरीतील वाटचालीत परदेशी खेळाडूंचे योगदान मोठे होते. संथ सुरवातीनंतर खेळाडूंनी खेळ उंचावला आणि बाद फेरीत प्रवेश केला. या वाटचालीत एफसी गोवाविरुद्ध झालेला 1-5 असा पराभव निर्णायक ठरला. त्यानंतरच मुंबईचे खेळाडू खडबडून जागे झाले. संघाचा गाभा कायम राखला तर या संघाचे भवितव्य उज्ज्वल असेल.
 
नॉर्थइस्ट युनायटेड एफसी ः सामान्य संघाची असामान्य कामगिरी
 
एल्को शात्तोरी यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थइस्टला खेळाडूंच्या दुखापती आणि निलंबनामुळे झगडावे लागले. खास करून बचावात त्यांना फटका बसला. यानंतरही संघभावना आणि उपलब्ध खेळाडूंच्या योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर संघात जान निर्माण झाली. ताण पडूनही या संघाने प्रथमच बाद फेरी गाठून एतिहासिक कामगिरी केली. मोक्याच्या टप्यात मात्र मिस्लाव कोमोर्स्की, बार्थोलोम्यू ओगबेचे, रॉलीन बोर्जेस, फेडेरीको गॅलेगो अशा खेळाडूंना दुखापती झाल्या. त्यामुळे नॉर्थइस्टची पिछेहाट झाली. आता पुढील मोसमाच्या तयारीसाठी वेळ मिळणार असल्यामुळे यंदाच्या सकारात्मक कामगिरीनंतर आणखी मोठ्या यशाचे स्वप्न नॉर्थइस्ट पाहू शकेल.
 
जमशेदपूर एफसी ः कामगिरी खराब नाही, पण पुरेशी चांगली सुद्धा नाही
 
जमशेदपूर एफसीला आश्वासक सुरवातीनंतर जास्त बरोबरी पत्कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांची बाद फेरीची संधी हुकली. अखेरपर्यंत पहिल्या चार संघांसाठी त्यांचे आव्हान कायम होते. त्यांच्या संघात गुणवत्ता होती. मायकेल सुसैराज आणि टिरी यांनी चांगला खेळ केला. सुसैराजने पदार्पणात प्रभाव पाडला. टीम कॅहील आणि सर्जिओ सिदोंचा यांना दुखापतींचा फटका बसला, पण मारीओ आर्क्वेस आणि मेमो यांनी मध्य फळीत भक्कम भागिदारी निर्माण केली. बाद फेरी हुकणे मात्र या संघासाठी निराशाजनक ठरले.
 
एटीके ः आशा उंचावून अखेरीस निराशा
 
एटीकेच्या संघात अनेक स्टार होते. त्यांचे राखीव खेळाडू सुद्धा इतर कोणत्याही क्लबकडे मुख्य संघात स्थान मिळविण्याच्या दर्जाचे होते, पण दुखापतींमुळे गेल्या मोसमापासून सुरु झालेला ताप यावेळीही कायम राहिला. गोल करणाऱ्या खेळाडूंची उणीव त्यांना भासली. बचाव फळीत मात्र स्टीव कॉपेल यांच्या संघाला आंद्रे बिके आणि जॉन जॉन्सन यांच्यामुळे चांगली साथ मिळाली. एमिलीयानो अल्फारो आणि कालू उचे या स्ट्रायकर्सना झालेल्या दुखापती पाहता कॉपेल यांना नियोजनात बदल करावा लागला. एदू गार्सिया आणि मॅन्युएल लँझरॉत यांना सातत्य राखता आले नाही. कोमल थातल आणि अंकित मुखर्जी या दोन गुणवान खेळाडूंचा उदय एटीकेसाठी उल्लेखनीय ठरला.
 
एफसी पुणे सिटी ः वेळीच सावरण्यात अपयश
 
मोसमाच्या प्रारंभी तीनच सामने झाल्यानंतर पुणे सिटीला प्रशिक्षक बदलावे लागले. निर्णायक विजय मिळविण्यात हा संघ झगडत होता. त्यामुळे मोहीमेला गती अशी येत नव्हती. हंगामी प्रशिक्षक प्रद्युम्न रेड्डी यांच्या चांगल्या प्रयत्नांमुळे संघ स्थिरावला. हिवाळी ब्रेकच्या सुमारास फिल ब्राऊन यांच्याकडे सुत्रे आली. अखेरच्या आठ सामन्यांत पुण्याचा एकच पराभव झाला. बाद फेरीसाठी झुंजण्याची क्षमता या संघाने दाखवून दिली. यामुळे पुढील मोसमासाठी हा संघ आतूर असेल.
 
दिल्ली डायनॅमोज ः तरुण, उत्साही संघाकडून निराशा
 
दिल्लीची सुरवात संथ होती. खेळाडूंना नवे प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांच्या शैलीशी जुळवून घेण्यास वेळ लागला. अखेरीस हे घडले तेव्हा संघाची गुणतक्त्यात पिछेहाट झाली होती. तरुण खेळाडूंच्या संघाने उत्साहाच्या जोरावर दुसऱ्या टप्यात चांगला खेळ केला. लालीयनझुला छांगटे, नंदकुमार शेखर, डॅनिएल लालह्लीम्पुईया आणि विनीत राय अशा खेळाडूंसह गोम्बाऊ यांनी संघाचा पाया रचल्याचे दिसते. पुढील मोसमात या संघाने गुणवत्तेचे कामगिरीत रुपांतर करायला हवे. हा संघ भविष्यासाठी चांगला तयार झाला आहे.
 
केरळा ब्लास्टर्स ः पाठोपाठ निराशा
 
मागील मोसमात बाद फेरी हुकल्यानंतर ब्लास्टर्सने नव्या आशेने सुरवात केली होती. सलामीला एटीकेविरुद्ध विजय मिळविल्यानंतर मात्र या संघाचे निकाल घसरले. 14 सामन्यांत त्यांना विजय मिळविता आला नाही. तेथेच त्यांच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या. त्यांना दोनच विजय मिळविता आले. गोलांचा अभाव आणि पास हेरू शकेल अशा कल्पक खेळाडूची उणीव ब्लास्टर्सला भोवली. त्यामुळे हा संघ नवव्या क्रमांकावर फेकला गेला. साहल अब्दुल समाद हाच खेळाडू त्यांच्यासाठी आशास्थान ठरला. त्याने मध्य फळीतून चमक दाखविली. त्यामुळे त्याला मोसमातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
 
चेन्नईयीन एफसी ः विजेते ते तळात इतकी टोकाची कामगिरी
 
जेतेपद राखण्याच्या मोहीमेला अपयशी सुरवात झाल्यानंतर जॉन ग्रेगरी यांचा संघ कधीच सावरू शकला नाही. त्यांना दोनच साने जिंकता आले. यातील पहिला विजय सहा सामने झाल्यानंतर मिळाला, तर दुसरा विजय तीन सामने बाकी असताना मिळाला. चेन्नईयीनच्या आक्रणात काहीही सफाई नव्हती. हा गतविजेता संघ मैदानावर अपेक्षित खेळ करू शकला नाही. हेन्रीक सेरेनोने क्लब सोडणे व धनपाल गणेशच्या दुखापतीमुळे त्यांना झगडावे लागले. ग्रेगरी यातून मार्ग काढू शकले नाहीत. बचाव ढिसाळ असताना जेजे लालपेखलुआ आणि कंपनी गोल करू शकत नव्हती. त्यामुळे हा गतविजेता संघ अखेरच्या स्थानावर फेकला गेला.

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/hero-isl-5-the-season-that-was/feed/ 0 46457
ISL 2018-19: पुढच्या हंगामातही मुंबई सिटी एफसीच्या प्रशिक्षकपदी होर्गे कोस्टा  https://mahasports.co.in/isl-2018-19-mumbai-city-fcs-coach-jorge-costa-extending-his-contract-with-the-islanders-for-another-season/ https://mahasports.co.in/isl-2018-19-mumbai-city-fcs-coach-jorge-costa-extending-his-contract-with-the-islanders-for-another-season/#respond Tue, 19 Mar 2019 10:10:11 +0000 https://mahasports.co.in/?p=46428

मुंबई: यंदाच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत मुंबई सिटी एफसी संघाने चमक दाखवत उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. पोर्तुगीजचे अनुभवी होर्गे कोस्टाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिटी एफसीला ही कामगिरी करता आली. त्यांनी देखील संघाला जेतेपद मिळवून देण्याच्या इराद्याने पुढील वर्षीही संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सिटी एफसी सोबतच्या आपल्या पहिल्या हंगामात  कोस्टाने आक्रमक फुटबॉलचे प्रदर्शन केले. त्यांच्या […]

www.mahasports.co.in

]]>
मुंबई: यंदाच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत मुंबई सिटी एफसी संघाने चमक दाखवत उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. पोर्तुगीजचे अनुभवी होर्गे कोस्टाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिटी एफसीला ही कामगिरी करता आली. त्यांनी देखील संघाला जेतेपद मिळवून देण्याच्या इराद्याने पुढील वर्षीही संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई सिटी एफसी सोबतच्या आपल्या पहिल्या हंगामात  कोस्टाने आक्रमक फुटबॉलचे प्रदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने चांगली कामगिरी करत हंगामात सलग नऊ सामन्यांमध्ये विजय मिळवत चमक दाखवली. त्यांनी गुणतालिकेत तळावरून उपांत्यफेरीत पोहोचण्यापूर्वी दुसरे स्थान मिळवले होते. क्लबच्या इतिहासात असे दुसऱ्यांदाच घडले आहे. बाद फेरीतील सामन्यात त्यांनी एफसी गोवा विरुद्ध विजय मिळवला पण, गोल फरकाच्या अंतराने अंतिम सामन्यात त्यांना पोहोचता आले नाही. आपल्या करार वाढीवर सही करताना आपण लगेचच तयारी दर्शवल्याचे 46 वर्षीय प्रशिक्षकाने सांगितले.
क्लब मधील माझ्या पहिल्या दिवसापासून मला व्यवस्थापन व स्टाफकडून खूप चांगले अनुभव मिळाले आहेत. मला माझे काम चांगल्या पद्धतीने करता यावे याकरता मुंबई सिटी एफसीच्या सर्वांनी मला मदत केली. आम्ही उपांत्यफेरीपर्यंत पोहचून देखील समाधानी नसलो तरीही हा हंगाम आमच्यासाठी संस्मरणीय राहिला असे कोस्टा म्हणाले.क्लब च्या इथपर्यंतच्या वाटचालीत फॅन्सचा खूप मोठा हात आहे. पुढील हंगामात देखील मुंबई सोबत असल्याने मी आनंदी असून फॅन्सना चांगल्या आठवणी देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे कोस्टा पुढे म्हणाले.
 पोर्तुगालच्या वरिष्ठ संघासोबत त्यांनी 50 सामन्यांमध्ये सहभाग नोंदवला असून दोन गोल झळकावले आहेत. त्यांनी आपली व्यवस्थापकीय कारकीर्द  एससी ब्रागापासून सुरुवात केली.कोस्टाने 2011-12 साली सीएफआर क्लूज संघाला रोमानियन लीग वन चे जेतेपद मिळवून देण्यात आपले योगदान दिले. यासोबत त्यांनी मुंबईला येण्यापूर्वी सायप्रस, गॅबन आणि फ्रान्स संघाला देखील मार्गदर्शन केले.आता होर्गे यांच्यासमोर हिरो सुपर कपमध्ये भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियममध्ये राऊंड ऑफ 16 मध्ये 29 मार्चला चेन्नईन एफसीचे आव्हान असणार आहे.

www.mahasports.co.in

]]>
https://mahasports.co.in/isl-2018-19-mumbai-city-fcs-coach-jorge-costa-extending-his-contract-with-the-islanders-for-another-season/feed/ 0 46428