हरमनप्रीत कौर ठरली CEATशी करार करणारी पहिली महिला क्रिकेटपटू

भारताची महिला अष्टपैलू क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरने CEAT बरोबर दोन वर्षाचा करार केल्याचे सीईएट प्रा.लि चे मार्केटिंग ऊपप्रमुख नितिश बजाज यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परीषेदेत जाहिर केले.

या कराराबरोबरच भारताचे स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा,अजिंक्य रहाणे व इशान किशन यांच्या पंक्तीत हरमनप्रीतने स्थान मिळवले.CEAT बरोबर संलग्न होणारी हरमनप्रीत कौर पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.इथून पुढे दोन वर्षांसाठी हरमनप्रीत सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेंमधे तीच्या बँटवर CEAT चे स्टिकर लावून खेळलेली दिसेल.

२०१७ हे भारतातीय क्रिकेटसाठी महत्वपूर्ण ठरले आहे.त्यामधे हरमनप्रीतच्या अष्टपैलू कामगिरीचे मोलाचे योगदान आहे. तिच्या कारकीर्दीत आजपर्यंत केलेल्या कामगिरीमुळे तिने जागतिक महिला क्रिकेटमध्ये स्वताचा प्रभाव निर्माण केला आहे. यामुळे आँस्ट्रेलियातील महिला बिग बँश क्रिकेट स्पर्धेंमधे भारतातून सहभागी होणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे.२०१६-२०१७ च्या मोसमात सिडनी थंडर्स या संघाने तीला करारबद्ध केले आहे.

२०१७ च्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ऊपांत्य सामन्यात भारताकडून विश्वचषकातील आतापर्यंतची १७१ धावांची सर्वेत्कृष्ठ खेळी केली होती. त्याचबरोबर तिने आजपर्यंतच्या कारकिर्दीत सातत्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारने २०१७ चा अर्जुन पुरस्कार बहाल केला आहे.

याबद्दल बोलताना तिने समाधान व्यक्त केले. “भारतीय क्रिकेटच्या स्टार खेळाडूंच्या पंक्तीत CEAT मुळे स्थान मिळाल्याने मी आनंदी आहे.२०१७ मधे मी जी कामगिरी केली आहे त्याचीच पुनरावृति करण्यासाठी मी सज्ज आहे. आजपर्यंत CEAT कायमच सर्व प्रकारच्या खेळ व खेळांना प्रोत्साहन देत आले आहे जे खेळांच्या विकासासाठी महत्वाचे आहे.” असे ती म्हणाली.