१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव

भारताची स्टार धावपटू हिमा दासने शनिवारी(20 जूलै) चेक रिपब्लिकमध्ये नोव मेस्तो नाद मेटुजी ग्रँड प्रिक्स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते. हे सुवर्णपदक पटकावताना तिने 52.09 सेंकदाचा वेळ घेतला.

विशेष म्हणजे हिमाचे हे मागील 19 दिवसातील 5 वे सुवर्णपदक आहे. याआधीची चार पदके तिने 200 मीटर शर्यतीत मिळवली आहेत. त्यामुळे 19 वर्षीय हिमावर तिने केलेल्या या शानदार कामगिरीमुळे सर्वच स्तरातून कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

तिला विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, जेष्ठ अभिनेते अभिताभ बच्चन, हॉकीपटू संदीप सिंग अशा अनेक दिग्गजांकडून हिमाला शुभेच्छा मिळाल्या आहेत.

हिमाला शुभेच्छा देताना मोदी यांनी ट्विट केले आहे की ‘मागील काही दिवसात हिमा दासने मिळवलेल्या शानदार यशाचा भारताला अभिमान आहे. तिने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 5 मेडल जिंकले आहेत, ज्याचा सर्वांना आनंद आहे. तिचे अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.’

तसेच सचिनने म्हटले आहे की ‘तू मागील 19 दिवसांपासून युरोपियन धावपट्टीवर ज्याप्रकारे धावत आहेत ते पाहताना चांगले वाटत आहे. तूझी जिंकण्यासाठी असणारी भूक आणि दृढनिश्चय हा युवांसाठी प्रेरणा आहे. तूझ्या 5 व्या मेडलसाठी अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा.’

हिमाने गेल्या 19 दिवसांतील पहिले सुवर्णपदक 2 जूलैला पोलंडमध्ये पोजनान ऍथलेटिक्स ग्रँड प्रिक्सस्पर्धेत 200 मीटरच्या शर्यतीत 23.65 सेकंदाची वेळ नोंदवत जिंकले होते. त्यानंतर तिने 7 जूलैला दुसरे सुवर्णपदक पोलंडलाच कुटनो ऍथलेटिक्स मीटमध्ये 200 मीटरच्या शर्यतीत जिंकले. ही शर्यत तिने 23.97 सेकंदात पूर्ण केली होती.

यानंतर तिने 13 जूलैला चेक रिपब्लिकमध्ये हुई क्लांदो मेमोरियल ऍथलेटिक्समध्ये 200 मीटरची शर्यत 23.43 सेकंदात पूर्ण करत तिसरे सुवर्णपदक जिंकले. तिने 17 जूलैला चेक रिपब्लिकमध्येच टॅबोर अथलेटिक मीटमध्ये 200 मीटर शर्यतीत चौथे सुवर्णपदक जिंकले. यावेळी तिने ही शर्यत 23.25 सेकंदात पूर्ण केली होती.

हिमावर विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून होणारा शुभेच्छांचा वर्षाव –

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही

मराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस