महिला विश्वचषक: स्मृती मांधनाला दिल्या दिग्गजांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा!

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मुती मंधानाचा आज २१वा वाढदिवस असून ती सध्या इंग्लंड येथे महिला विश्वचषक उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सामन्याची तयारी करत आहे.

१८ जुलै १९९६ रोजी जन्मलेल्या स्मृतीवर आज वाढदिवसानिमित्त कौतुकाचा वर्षाव होत आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यात शतकी खेळी करून स्मृती विश्वचषकात शतक करणारी केवळ ४थी भारतीय खेळाडू बनली होती.

परंतु त्यांनतर तिला या विश्वचषकात विशेष अशी छाप सोडता आली नाही. ९०, १०६*, २, ८, ४, ३, १३ अशी स्मृतीची ७ सामन्यातील कामगिरी राहिली आहे.

उपांत्यफेरीत भारतीय संघाला स्मृतीकडून मोठ्या अपेक्षा आहे. २१ वर्षीय स्मृतीला आज कुणी कुणी शुभेच्छा दिल्या ते आपण पाहूया.