भारतीय फिरकी गोलंदाजांचा दक्षिण आफ्रिकेत जलवा! ५ खास विक्रम

भारतीय रिस्ट स्पिनर युझवेन्द्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांनी १० पैकी ८ विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला ३२.२ षटकांत ११८ सर्वबाद केले. याचमुळे भारताने आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

या सामन्यात झालेले विक्रम-

-युझवेन्द्र चहलची ५/२२ ही वनडेत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी

-युझवेन्द्र चहल हा दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ विकेट घेणारा पहिला फिरकी गोलंदाज

-युझवेन्द्र चहल: ५/२२ ही दक्षिण आफ्रिकेतील फिरकी गोलंदाजांची दुसरी सर्वोत्तम कामगिरी. आफ्रिकेच्या निकी बोयेने २१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.

-युझवेन्द्र चहल: आफ्रिकेविरुद्ध आफ्रिकेत वनडेतील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी. वासिम अक्रम यांनी १६ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.

-दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत ५ विकेट्स घेणारा युझवेन्द्र चहल हा सुनील जोशी यांच्यानंतरचा दुसराच भारतीय फिरकी गोलंदाज

-११८ ही दक्षिण आफ्रिकेची वनडेतील दक्षिण आफ्रिकेतील सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. यापूर्वी ते इंग्लंडविरुद्ध २००९मध्ये ११९ धावांवर बाद झाले होते.

-आशिष नेहरा(२००३) आणि युझवेन्द्र चहल ह्या दोनच भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेत ५ विकेट्स घेतल्या आहेत.