डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट

रविवारी, 14 जूलैला लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड क्रिकेट संघाने 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आणि 44 वर्षांचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न पुर्ण केले. या विजयानंतर इंग्लंड संघावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

इंग्लंड संघाला शुभेच्छा देणाऱ्या सेलिब्रेटिंमध्ये आता डब्ल्यूडब्ल्यूईचा सीओओ आणि माजी पहिलवान ट्रिपल एचचाही समावेश झाला आहे. डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार असणाऱ्या ट्रिपल एचने खास कस्टम चॅम्पियनशिप बेल्ट इंग्लंड संघाला भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याने इंग्लंडला शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘शानदार स्पर्धा आणि आश्चर्यकारक अंतिम सामना. इंग्लंडला आयसीसी 2019 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवल्याबद्दल शुभेच्छा. तसेच हा खास कस्टम चॅम्पियनशिप बेल्ट तूमच्यासाठी.’

याआधीही त्याने मुंबई इंडियन्सने आयपीएलचे विजेतेपद मिळवल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला एक कस्टम चॅपियनशिप दिली होती.

रविवारी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडलेल्या 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या या नाट्यपूर्ण अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 241 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला विजयासाठी 50 षटकात 242 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडलाही 50 षटकात सर्वबाद 241 धावाच करता आल्या. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली होती. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या. तर नंतर न्यूझीलंडलाही 16 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुपर ओव्हरमध्ये 15 धावाच करता आल्या होत्या.

त्यामुळे सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्याने अखेर इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा या सामन्यात जास्त बाऊंड्री मारल्या असल्याने इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

या कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश

आर अश्विनने टाकलेल्या या चेंडूचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल, पहा व्हिडिओ

वाढदिवस विशेष: विचित्र शैलीचा मोहंती