चॅम्पियन्स लीग ड्राॅ: चेल्सी भिडणार बार्सिलोनाशी तर जुवेंटसचा सामना टोट्टेन्हमसोबत

आज युएफा चॅम्पियन्स लीगचा अंतिम १६ संघांचे भवितव्य ठरवणारा ड्राॅ पार पडला. ८ गटातून ८ उपविजेत्या संघांचे उर्वरित गटाच्या विजेत्या संघातील एका संघाबरोबर सामना ठरणार होता. त्यानुसार १-१ उपविजेत्या संघासमोर उर्वरित गटातील संघांचे नाव काढण्यात आले.

१६ संघांचे पहिल्या लेगचे सामने १३ व १४ फेब्रुवारी आणि २० व २१ फेब्रुवारीला होतील. पहिल्या लेगचे सामने हे उपविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जातील. तर दुसऱ्या लेगचे सामने ६ व ७ मार्च आणि १३ व १४ मार्चला खेळवले जातील.

पहिल्या ड्राॅ मध्ये गतवर्षीचा उपविजेता जुवेंटसचा सामना टोट्टेन्हम हाॅटस्पर बरोबर असेल. जुवेंटस डी गटातून उपविजेती तर स्पर्स एच गटातून विजेती होती. सेव्हिलाचा सामना मॅन्चेस्टर युनाएटेड बरोबर असेल तर बासिल समोर मॅन्चेस्टर सिटीचे तगडे आव्हान आहे.

चेल्सीचा सामना ड गटातील विजेत्या बार्सिलोना बरोबर आहे. चेल्सी हा एकमेव असा संघ आहे ज्याच्या विरोधात ४ पेक्षा जास्त सामने खेळून सुद्धा बार्सिलोनाचा स्टार मेस्सीला एक पण गोल करण्यात यश आले नाही.

चेल्सी बरोबर ८ सामन्यात मेस्सीने १ पण गोल केला नाही त्यात १ सामन्यात विजय ५ सामने बरोबरीत तर २ सामन्यात बार्सिलोनाला पराभव स्विकारावा लागला होता.

मागील वर्षीचे विजेते रियल मॅड्रिड समोर पॅरिस सेंट जर्मनचे आव्हान आहे. हा सामना या ड्राॅचे प्रमुख आकर्षण ठरला. ६ साखळी सामन्यात तब्बल २५ गोल्स करत पीएसजी ब गटात पहिल्या स्थानावर होती तर ६ सामन्यात ४ विजयासह रियल मॅड्रिड एच गटात दूसर्या क्रमांकावर होती.

चेल्सीचे या ड्राॅमुळे १३ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान ४ सामने खालील प्रमाणे खेळतील;
१३ फेब्रुवारी चेल्सी विरुद्ध बार्सिलोना
२४ फेब्रुवारी मँचेस्टर युनाइटेड विरुद्ध चेल्सी
३ मार्च मँचेस्टर सिटी विरुद्ध चेल्सी
६ मार्च बार्सिलोना विरुद्ध चेल्सी