मेस्सीने आठवी हॅट्ट्रीक करत रोनाल्डोला टाकले मागे

चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोना स्टार लियोनल मेस्सीने पीएसव्ही इंडोव्हेन विरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील 42वी आणि युरोपियन लीगची आठवी हॅट्ट्रीक केली. यामुळे बार्सिलोनाने हा सामना 4-0 असा जिंकला.

युरोपियन लीगमध्ये हॅट्ट्रीक आणि साखळी फेरीत सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत मेस्सीने क्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकले आहे. रोनाल्डोने युरोपियन लीगमध्ये एकूण सात हॅट्ट्रीक आणि मेस्सीपेक्षा एक गोल कमी असे 60 गोल केले आहेत.

तसेच यावर्षी मेस्सीने बार्सिलोनासाठी आठ गोल केले असून त्याला खेळायला अजून 18 सामने बाकी आहेत. यामुळे त्याला आणखी गोल करण्याची संधी आहे.

इंडोव्हेनने सामन्याला आक्रमक सुरूवात केली होती. यावेळी मिडफिल्डर गॅस्तो पेरेरोने सामन्याच्या आठव्या मिनिटाला गोल करण्याची संधी दवडली.

बार्सिलोनाकडून मेस्सी बरोबरच ओस्माने डेम्बेले, फिलिपे काउटीन्हो आणि लुइस सुआरेजने यांनी इंडोव्हेनवर चांगलाच हल्ला चढवला होता. मात्र इंडोव्हेनने 4-2-3-1च्या फॉर्मेशनने खेळत असल्याने गोल करण्याच्या संधी कमी होत्या.

यातच मेस्सीने 32व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाला पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सत्राची दोन्ही संघांनी चांगली सुरूवात केली. यावेळी उरुग्वेचा फॉरवर्ड सुआरेजला दुसरा गोल करण्याची संधी होती पण इंडोरेव्हचा गोलकिपर झोएटने तो अडवला. पण सामन्याच्या 74व्या मिनिटाला डेम्बेलेने गोल करत बार्सिलोनाला 2-0 असे आघाडीवर नेले.

मात्र डेम्बेलेनंतर मेस्सीने तीन मिनिटांनंतर त्याची हॅट्ट्रीक पूर्ण करत संघाचा विजय निश्चित केला. सामन्याच्या 79व्या मिनिटाला सॅम्युअल उमटीटीला रेड कार्ड मिळाले. यामुळे त्याला टोटेनहॅम हॉटस्पर विरुद्धच्या सामन्यात खेळता येणार नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशिया कप २०१८: शिखर धवनचा विक्रमांचा सिलसिला सुरूच

एशिया कप २०१८: भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानला सुरुवातीलाच दिले दोन धक्के

हा खेळाडू जिंकणार गोल्डन बूट, चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी यांची भविष्यवाणी