पाकिस्तानी फॅन्सच्या त्या बोलण्यावर शमी चिडला

भारताच्या दारुण पराभवांनंतर ड्रेसींग रूममध्ये जात असलेल्या भारतीय संघाला पाकिस्तानी फॅन्सने काल मोठ्या प्रमाणावर डिवचल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान संघाने १८० धावांनी भारतावर विजय मिळविला. यांनतर ड्रेसिंग रूममध्ये टीम जात असताना एका पाकिस्तानी फॅनने भारताचा कर्णधार विराट कोहलीला डिवचले. त्यात तो फॅन म्हणत होता की “कोहली अक्कड तूट गयी हैं ‘तेरी कोहली सारी” यावर भारतीय कर्णधाराने कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून जाणे पसंद केले.

परंतु त्यांनतर जाणाऱ्या एकही भारतीय खेळाडूला या फॅन्सने चिडवणे सोडले नाही. या फॅनने त्यानंतर असंख्य वेळा भारतीय खेळाडूंना “बाप कौन हैं, बाप कौन हैं” असं विचारलं. विराटप्रमाणेच भुवनेश्वर कुमार, अश्विन, युवराज यांनीही तिथून निघून जाणे पसंद केले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने याकडे आधी दुर्ल्क्ष केले परंतु या फॅनकडून तरीही चिडवणे सुरूच असल्यामुळेशमीने पाठीमागे फिरून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शमी काय म्हणाला हे व्हिडिओमध्ये नक्की समजत नसले तरी त्याला भारताच्या माजी कॅप्टन कूल धोनीने शांत केले. सुरक्षारक्षकाने या फॅनला नंतर शांत बसण्याचा इशारा केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.