सर्वांचे डोळे भारत इंग्लंड अंतिम सामन्याकडे ??

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आता अंतिम टप्यात येऊन ठेपली आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताने आपली दावेदारी सिध्द केली आहे. भारताबरोबरच इंग्लंड देखील या मालिकेत उत्तम लयीत असल्यामुळे विजयासाठी पसंतीचा संघ आहे, शिवाय ट्रॉफी इंग्लंडमध्ये खेळवली जात असल्यामुळे त्यांना नक्कीच फायदा आहे.

 

भारताचा बांगलादेशशी उपांत्य सामना असून इंग्लंडचा प्रतिस्पर्धी पाकिस्तान आहे. नुक्यातच इंडियन हाय कमिशनच्या कार्यक्रमात बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की सर्वाना भारत-इंग्लंड अंतिम सामना पहायला आवडेल असे चित्र आहे. उपांत्य सामान्यांपेक्षा लीग सामने अवघड असतात असे देखील कोहली म्हणाला. इंग्लंड आणि भारत जर उत्तम कामगिरी करू शकला तर चाहत्यांना हवा तसा अंतिम सामना होऊ शकेल.

 

चाहत्यांना धन्यवाद देत कोहली म्हणाला की इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे संघाला कायम एक बळ मिळाले आणि नवी उमेद जागी झाली. या कार्यक्रमात कोहली सोबत धोनी, अनिल कुंबळे देखील उपस्थित होते. इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्याची मजा काही और आहे असे कोहली म्हणाला, पावसाळी हवामानामुळे खेळणे थोडे कठीण जाते असेही कोहली म्हणाला.

आता नक्की काय निकाल लागतोय आणि कोणता संघ अंतिम सामन्यात बाजी मारतोय हे मात्र वेळच सांगेल.