इंग्लिश बोलण्यावरून वीरू सर्फराजच्या पाठीशी

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु झाल्यापासून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या वीरेंद्र सेहवागने प्रथमच पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदच्या समर्थनार्थ ट्विट केला आहे. गेल्या आठवड्यापासून सर्फराझच्या इंग्लिश बोलण्यावर त्याची मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यानंतर सर्फराज अहमदचा पत्रकार परिषदमधील एक व्हिडिओ बाहेर आला आणि त्याला मोठ्या प्रमाणावर ट्विपलने ट्विटरवर ट्रॉल केले. यावर सर्फराझने कोणतेही भाष्य करणे टाळले. परंतु रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सेहवागने त्यासाठी पुढाकार घेत ट्रॉल करणाऱ्या सर्वांना जोरदार चपराक लावली आहे.

सेहवाग आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ” इंग्लिश नीट येत नाही म्हणून सर्फराजला ट्रॉल कारण चुकीचं आहे. त्याच मुख्य काम हे क्रिकेट खेळणं आहे आणि ते त्याने पाकिस्तानला अंतिम सामन्यात नेवून दाखवून दिल आहे. त्याला इंग्रजी माहित असणं हे त्याच काम नाही. त्याच काम इंग्लिश संघांना हरवणं हे होत. आणि त्याने ते करून दाखवलं आहे. उद्या हिंदुस्थान जिंदाबाद. ”