चॅम्पियन्स ट्रॉफीचे गतविजेते !

0 44

११९८ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली. मिनी विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आयसीसी रँकिंगमधील टॉपचे ८ संघच भाग घेऊ शकतात. विश्वचषकाप्रमाणे या स्पर्धेत सहयोगी देशांना स्थान नसते. या वर्षी ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार असून यात मागील मोसमाचा विजेता असलेला भारत संघासह भारतीय उपखंडातील आणखी तीन देश म्हणजेच पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश स्पर्धेत सहभागी होणार आहेत. वेस्ट इंडिजच्या आयसीसी क्रमांकावरचा क्रमांक मिळवून बांगलादेश ही स्पर्धा खेळणार आहे. पाहुयात चॅम्पिअन्स ट्रॉफीचा इतिहास.

दक्षिण आफ्रिका १९९८

दक्षिण आफ्रिकेने १९९८ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली. आयसीसीच्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला आतापर्यंत या एकमेव स्पर्धेत विजेतेपद पटकावता आले आहे. ढाकामध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४ विकेट्सने दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला धूळ चारली आणि दक्षिण आफ्रिका पहिल्यावाहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेते ठरले.

Master 300x197 - चॅम्पियन्स ट्रॉफीचे गतविजेते !

न्यूझीलँड २०००

ज्या संघाना विश्वचषक जिंकता आला नाही ते संघ हा मिनी विषवचशक जिंकत होते. आधी दक्षिण आफ्रिका १९९८ आणि २००० मध्ये न्यूझीलँडने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. २०००च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला ४ विकेट्सने न्यूझीलँडने हरवले. केनिया मधील नैरोबी येथे न्यूझीलँडने आपली पहिली आणि एकमेव आयसीसी ट्रॉफी जिंकली.

Master 1 300x214 - चॅम्पियन्स ट्रॉफीचे गतविजेते !

भारत आणि श्रीलंका २००२
११२ षटकांचा सामना होऊन सुद्धा या सामन्याचा निकाल का लागला नाही ? पहिल्या दिवशी पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा सामना तिथूनच का सुरु केला नाही ? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांचं उत्तर अजूनही क्रिकेटरसिकांना मिळालेलं नाही. भारताने २ वेळा श्रीलंकेच्या फलंदाजांना २४४ आणि २२२ अश्या धावसंख्येवर रोखले आणि दोनही वेळेस भारताच्या फलंदाजीच्या वेळेस पाऊस पडला. यामुळे पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीला २ विजेते मिळाले.

Master 2 300x200 - चॅम्पियन्स ट्रॉफीचे गतविजेते !

वेस्ट इंडिज २००४

आतापर्यंतच्या चॅम्पिजन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक चुरशीचा झालेल्या या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडला त्याच्याच मैदानावर २ विकेट्सने मात दिली. २१७ धावांचा पाठलाग करताना १४७ वर वेस्ट इंडिजच्या ८ विकेट्स पडल्या होत्या तेव्हा इंग्लंडला असे वाटले असेल की आता ते सहज जिंकणार पण तेव्हाच वेस्ट इंडिजच्या तळाच्या फलंदाजांनी चिकाटीचा खेळ दाखवला आणि सामना ४९व्या षटकात जिंकला.

Master 3 300x200 - चॅम्पियन्स ट्रॉफीचे गतविजेते !

 

ऑस्ट्रेलिया २००६
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजच्या संघाचा धुवा उडवला. मुंबईतील ब्रेबन स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रिलाने वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सने पराभव केला.

Master 4 300x200 - चॅम्पियन्स ट्रॉफीचे गतविजेते !

ऑस्ट्रेलिया २००९

डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून या स्पर्धेत उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ या ही मोसमात चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला. आतापर्यँत ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे ज्यांनी चॅम्पिअन्स ट्रॉफी सलग २ मोसमात जिंकली आहे. त्याकाळात ऑस्ट्रेलियाचा संघाला हरवणे जवळ जवळ मुश्कीलच होते. दक्षिण आफ्रिकेमधील सेनचुरियनच्या स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलँड संघ प्रथम फलंदाजी करताना २०० च धावा करू शकला आणि ऑस्ट्रिलाने वॉट्सनच्या शतकाच्या जोरावर सामना सहा विकेट्सने जिंकला.

Master 5 300x199 - चॅम्पियन्स ट्रॉफीचे गतविजेते !

भारत २०१३

२००२ नंतर प्रथमच अंतिम सामान्यपर्यंत भारत पोहचला होता तर घरच्या मैदानावर खेळताना इंग्लंडकडे पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा मोक्का होता. पावसाच्या ,व्यत्ययामुळे हा सामना २० षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने १२९ धावा केल्या आणि या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाची अवस्था ४६ धावांवर ४ बाद अशी झाली होती. मॉर्गन आणि बोपारा चांगली फलंदाजी करत होते पण धोनीने इशांतला गोलंदाजी दिली आणि त्याने २ चेंडूत दोघांना बाद केले आणि सामना फिरवला. हा सामना भारताने ५ धावांनी जिंकला आणि दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

Master 6 300x180 - चॅम्पियन्स ट्रॉफीचे गतविजेते !

Comments
Loading...
%d bloggers like this: