चंडिमल भारताविरुद्धच्या उर्वरित मालिकेतून बाहेर !

पल्लेकेल: येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दिनेश चंडिमलला हाथाच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्यामुळे आता तो या मालिकेतील उर्वरित सामने खेळणार नाही.

रविवारच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या उसळत्या चेंडूचा सामना करताना चंडिमलला हाथाच्या अंगठ्याला दुखापत झाली. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ विकेट्सने धुवा उडवला आणि मालिका खिशात घातली.

” श्रीलंकेच्या कसोटी कर्णधार दिनेश चंडिमलला उजव्या हाथाच्या अंगठ्याला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले आहे आणि आता त्यामुळे उर्वरित मालिकेत तो खेळणार नाही. कोलंबो मधील स्पेशालिस्ट डॉक्टरला भेटल्यानंतरच त्याच्या पुनरागमनाबद्दल आम्ही काही बोलू” असे श्रीलंका क्रिकेट बॉर्डच्या सदस्याने सांगितले.

गुरवारी या मालिकेतील चौथा सामना कोलंबो येथे होणार आहे, आणि शेवटचा सामना रविवारी होणार आहे. श्रीलंका आणि भारतामध्ये एकदिवसीय मालिकेनंतर एक टी-२० सामना ही होणार आहे.