Video: चेल्सीच्या स्टार फुटबॉलपटूने विराट कोहलीच्या टीम इंडियाला दिल्या खास शुभेच्छा

ब्राझील फुटबॉल संघाचा माजी कर्णधार आणि चेल्सीचा बचावपटू डेव्हिड लुईजने सोमवारी भारतीय संघाला आणि कर्णधार विराट कोहलीला आगामी विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विटरवरुन शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओद्वारा लूईजने विराट कर्णधार असलेल्या भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. लूईजने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की ‘हॅलो, विराट कोहली. विश्वचषकासाठी तूला शुभेच्छा. देवाचा अशिर्वाद तूझ्याबरोबर आणि तूझ्या संघाबरोबर असो. मी तूला पाठिंबा देत आहे. लवकरच भेटू.’

32 वर्षीय लूईज हा या आठवड्यात युरोपा लीगच्या अंतिम सामन्यात अर्सेनलविरुद्ध मैदानात उतरणार आहे. त्याने विराटसह पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू इमाद वासिमलाही शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याने वासिमला शुभेच्छा देताना म्हटले आहे की ‘इमाद वासिम तूला विश्वचषकासाठी शुभेच्छा. तू चांगला खेळाडू आहेस. आशा आहे की तूम्ही जिंकाल आणि स्पर्धेची मजा घ्याल.

इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरि केननेही घेतली विराटची भेट – 

काही दिवसांपूर्वी  इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरि केनने विराटची भेट घेतली होती. या भेटीदरम्यानचा या दोघांचा फोटो केनने सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे. त्याचबरोबर त्याने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की ‘मागील काही वर्षांतील अनेक ट्विट्सनंतर अखेर विराटला भेटलो. तो चांगला व्यक्ती असून शानदार खेळाडू आहे.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

‘यूनिवर्स बॉस’ गेलने या दिग्गज खेळाडूला केले २०२३ चा विश्वचषक खेळण्यासाठी प्रभावित…

एका विश्वचषकात या संघाने केले आहेत सर्वाधिक शतके, टीम इंडिया आहे या स्थानावर

या दिग्गज क्रिकेटपटूच्या निधनाची पसरली खोटी बातमी; स्वत: क्रिकेटपटूने केला खूलासा