८५ वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये जे झाले नाही ते आज पुजाराने केले

सेंच्युरियन । भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत कोणताही खेळाडू कधीही एकाच कसोटी सामन्यात दोन वेळा धावबाद झाला नव्हता. आज भारतीय संघाचा कणा समजल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने हा नकोसा असा विक्रम आपल्या नावे केला आहे.

पुजाराला पहिल्या डावात लुंगी न्गिडी या खेळाडूने धावबाद केले होते तर आज त्याला एबी डिव्हिलिअर्स आणि डिकॉक जोडीने धावबाद केले.

गेल्या १८ वर्षांत कोणताही खेळाडू कसोटीच्या दोन्ही डावात धावबाद झाला नाही.

अशी नकोशी कामगिरी करणारा तो जगातील २३वा खेळाडू बनला आहे. यापूर्वी न्यूझीलँड संघाचा कर्णधार स्टीफन फ्लेमिंग डिसेंबर २०००मध्ये दोन्ही डावात धावबाद झाला होता.

तिसऱ्या क्रमांकावरील खेळाडू दोन वेळा बाद होण्याची ही कसोटी क्रिकेटमधील केवळ तिसरी वेळ आहे.