खिशात पाण्याची बाटली ठेऊन अर्धशतक करणारा पुजारा जगातील पहिलाच खेळाडू

राजकोट | भारत विरुद्ध विंडीज कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या सत्रात २५ षटकांत १ बाद १३१ धावा केल्या आहेत. सध्या सलामीवीर पृथ्वी शाॅ ७५ तर पुजारा ५४ धावांवर खेळत आहे.

या सामन्यातील २१व्या षटकातील ५व्या चेंडूवर पुजाराने एक धाव घेतल्यावर तो नाॅन स्ट्राईकला गेला. तेव्हा त्याने चक्क खिशातून पाण्याची छोटी बाटली काढत पाणी घेतले. यापुर्वी क्रिकेटमध्ये असे कधीही पाहिला मिळाले नव्हते.

खेळाडूंना कसोटीत दिवसात तीन वेळा ड्रींक्स ब्रेक तसेच लंच आणि टी ब्रेक असे एकुण ५ ब्रेक दिले जातात. तसेच बऱ्याच वेळा फलंदाजी करणारे खेळाडू राखीव खेळाडूला पाणी किंवा ड्रींक्स घेऊन मैदानात बोलवतात. तरीही पुजाराने खिशातच पाण्याची बाटली ठेवल्यामुळे येथील उकाडा किती असह्य होत असेल याचा अंदाज येतो.

सध्या भारतात आॅक्टोबर हीटमुळे जोरदार उकाडा जाणवत आहे. तसेच सामन्यादरम्यान दुपारी उन्हाचा पारा ४० डिग्रीपर्यंत जाईल असे बोलले जात आहे.

याचमुळे पुजाराने असे केल्याचे बोलले जात आहेत. यामुळे मात्र नेटिझन्स जोरदार ट्विट करत आश्चर्य व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या-