चेतेश्वर पुजारा करावे तेवढे कौतुक कमीच, क्रिकेटप्रती असलेले प्रेम पुन्हा दिसुन आले!

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजार भारतातील अफगानिस्तान विरूद्धचा कसोटी सामना झाल्यानंतर पुन्हा कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये पोहचला आहे.

सोमवार दि. 18 जूनला रॉयल लंडन चषकातील दुसरा उपांत्य सामना साउथहॅप्टन येथे यार्कशायर वि. हॅम्पशायर यांच्यात खेळला जाणार आहे.

चेतेशवर पुजारा यामध्ये यार्कशायर संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. अफगानिस्तान सामन्यापूर्वी पुजाराने रॉयल लंडन चषकासाठी इंग्लंडमध्येच होता. त्याला अफगानिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात समाविष्ठ व्हावे लागले होते.

रॉयल लंडन चषकात पुजारा यार्कशायरकडून 7 सामने खेळला आहे. त्यांमध्ये त्याने 370 धावा केल्या आहेत.

भारत-अफगानिस्तान कसोटी सामना आज 18 जूनला संपनार होता. पण भारत-अफगानिस्तान कसोटी सामना दुसऱ्याच दिवशी संपल्याने चेतेश्वर पुजारा रॉयल लंडन चषकातील दुसरा उपांत्य सामना खेळण्यासाठी उपलब्ध झाला असल्याने त्याची या सामन्याच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये निवड झाल्याचे यॉर्कशायर संघाने ट्वीटर वरून जाहिर केले.

महत्वाच्या बातम्या-

फिफा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याने चक्क नाकारली ‘मॅन आॅफ द मॅच’

स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात