आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: चेतेश्वर पुजाराच्या शतकाने राखली भारताची लाज

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आजपासून(6 डिसेंबर) चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. हा सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर 87.5 षटकात 9 बाद 250 धावा केल्या आहेत. भारताकडून चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी केली.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारताची पहिल्या डावाची सुरुवात अंत्यत खराब झाली. भारताच्या केएल राहुल(2), मुरली विजय(11), कर्णधार विराट कोहली(3) आणि अजिंक्य रहाणे(13) या चार फलंदाजांनी एकापाठोपाठ स्वस्तात विकेट गमावल्या.

त्यामुळे भारताची अवस्था 20.2 षटकात 4 बाद 41 धावा अशी झाली. पण त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या पुजाराने रोहित शर्माला साथीला घेतले. पण पाचव्या विकेटसाठी त्यांनी 45 धावांची भागीदारी रचली असतानाच रोहितला नॅथन लायनने बाद केले.

त्यानंतर काही वेळात रिषभ पंतलाही(25) लायननेच बाद केले. पण यानंतर मात्र आर अश्विनने पुजाराला भक्कम साथ देताना सातव्या विकेटसाठी 62 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. पण अश्विन 25 धावांवर असताना बाद झाला. त्याच्यानंतर काही वेळाने मिशेल स्टार्कने इशांत शर्माला(4) त्रिफळाचीत केले.

इशांत बाद झाल्यानंतरही मोहम्मद शमीने पुजाराला चांगली साथ दिली. या दोघांनी नवव्या  विकेटसाठी 40 धावांची भागीदारी रचत भारताला 250 धावांचा टप्पा गाठून दिला. पण पुजारा धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना पॅट कमिन्सने त्याला धावबाद केले.

पुजाराने या सामन्यात पहिल्या डावात 246 चेंडूत 123 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 7 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. तसेच दिवसाखेर शमी 6 धावांवर नाबाद आहे.

आॅस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क(2/63), पॅट कमिन्स(2/49), जोश हेझलवूड(2/53) आणि नॅथन लायनने(2/83) विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

चेतेश्वर पुजारा-राहुल द्रविड बाबतीत घडला बाप योगायोग!

तीन धावांवर बाद होऊनही कर्णधार कोहलीने केला हा खास पराक्रम

कसोटीत या गोलंदाजाने रोहित शर्माची घेतली आहे सर्वाधिक वेळा विकेट

धोनीमुळे मी निवृत्ती घेतलेली नाही- व्हिव्हिएस लक्ष्मण