चेतेश्वर पुजारा अर्जुन पुरस्काराने सन्मानित !

भारताचा कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता चालू असलेल्या श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिकेत त्याने भारताकडून खेळताना ३ सामन्यात २ शतके लगावली होती, त्याच बरोबर त्याने या पूर्ण कसोटी मोसमात चांगला खेळ केला आहे.

चेतेश्वर पुजारा हा माजी रणजी खेळाडू अरविंद शिवलाल पुजारा यांचा पुत्र आहे. क्रिकेट हे लहानपानापासूनच पुजाराच्या घरात त्याने बघितले होते. आपल्या वडिलांप्रमाणेच त्याने आपले देशांतर्गत क्रिकेट सौराष्ट्र या रणजी संघाबरोबर चालू केले. २०१०मध्ये बंगलोरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिला सामना खेळला. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी काही छाप पडली त्याला भारतीय संघाची नवीन भिंत म्हणून लोक ओळखायला लागले.

पुजाराने आतापर्यंत कसोटीत ५१ सामने खेळले आहेत ज्यात त्याने ४१०७ धावा केल्या आहेत. या सामन्यात त्याची सरासरी ५२ची आहे .त्याने आतापर्यंत कसोटीत १३ शतके आणि १५ अर्धशतके केली आहेत.

चेतेश्वर पुजारा हा भारतासाठी कसोटीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज करतो, या ठिकाणी त्याच्या आधी द वॉल म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड खेळायचा त्याच्या निवृत्ती नंतर पुजाराने त्याची जागा घेतली. द्रविडनंतर कोण हा प्रश्न चेतेश्वर पुजाराने सोडवला आहे.

चेतेश्वर पुजाराबरोबर क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरलाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.