भारताचा स्टार फुटबाॅलपटूने लिओनेल मेस्सीला टाकले मागे

अबुधाबी| एएफसी आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेत रविवारी (6 जानेवारी) भारताने आपल्या मोहिमेला दमदार प्रारंभ केला. सुनील छेत्रीच्या दोन गोलांच्या जोरावर भारताने थायलंडचा 4-1 असा धुव्वा उडविला.

या सामन्यात केलेल्या दोन गोलमुळे छेत्रीचे 67 आंतरराष्ट्रीय गोल झाले आहेत. यासाठी त्याने 105 सामने खेळले आहेत.

छेत्रीने सामन्याच्या 27व्या मिनिटाला गोल करत आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळविले. त्याने जेव्हा थायलंड विरुद्ध पहिला गोल केला तेव्हा तो त्याचा 66वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. यामुळे त्याने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मेस्सीने 128 सामन्यात खेळताना 65 गोल केले आहेत. पहिल्या स्थानी पोर्तूगालचा ख्रितियानो रोनाल्डो आहे. त्याने 154 सामन्यांमध्ये 85 गोल केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

थायलंडविरुद्ध चार गोलांसह भारताची दमदार सलामी

वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी

Video: विराट कोहलीपाठोपाठ हार्दिक पंड्याचाही मैदानात डान्स