इस्लामपूर-सांगलीत रंगणार छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचा थरार, गटवारी जाहीर

छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट आंतर राज्य कबड्डी स्पर्धा-२०१८. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. यांच्यावतीने सांगली जिल्हा कबड्डी असो.दि. २० ते २३ डिसेंबर २०१८ या कालावधीत “छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट आंतर राज्य कबड्डी स्पर्धेचे” आयोजन करत आहे.

जयंत पाटील खुले नाट्यगृह मैदान, ताकारी रोड, इस्लामपूर, जिल्हा सांगली होणाऱ्या या स्पर्धेत नुकत्याच सिन्नर-नाशिक येथे झालेल्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत बाद फेरी गाठलेल्या १२ पुरुष आणि १२महिला संघांना सहभाग देण्यात आला आहे. तर विदर्भ राज्य कबड्डी असो.ला संलग्न असलेल्या ४पुरुष व ४महिला संघांना या स्पर्धेत सहभाग देण्यात आला आहे.

यास्पर्धेत १६ सहभागी संघाची ४ गटात विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटात ४संघ असतील. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. या करिता ४ क्रीडांगणे तयार करण्यात आली असून सामने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येतील. या स्पर्धेत खेळणाऱ्या संघाची गटवारी आज राज्य कबड्डी असो.चे सचिव आस्वाद पाटील यांनी प्रसाद माध्यमांसाठी जाहीर केली. ती खालील प्रमाणे.

पुरुष विभाग:-
अ गट :-१)रायगड, २)नंदुरबार, ३)बीड, ४)अमरावती.
ब गट :- १)सांगली, २)कोल्हापूर, ३)अहमदनगर, ४)नागपूर.
क गट :- १)रत्नागिरी, २)पुणे, ३)ठाणे, ४)भंडारा.
ड गट :- १)मुंबई शहर, २)मुंबई उपनगर, ३)नाशिक, ४)अकोला.

महिला विभाग :-
अ गट :- १)पुणे, २)ठाणे, ३)सातारा, ४)अमरावती.
ब गट :- १)मुंबई उपनगर, २)नाशिक, ३)रायगड, ४)नागपूर.
क गट :- १)रत्नागिरी, २)मुंबई शहर, ३)अहमदनगर, ४)अकोला.
ड गट :- १)पालघर, २)कोल्हापूर, ३)सिंधुदुर्ग, ४)बुलढाणा.

महत्त्वाच्या बातम्या:

महाराष्ट्र केसरी यशोगाथा भाग १- सुरू झाले नवे कुस्तीपर्व

महाराष्ट्र केसरी यशोगाथा २- कुस्तीगीरांचा कुुंभमेळ्यात डंका लालमातीचाही

महाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- मोहोळ कुटुंबियाकडून सलग 35 व्या वर्षी गदेचे बक्षिस

महाराष्ट्र केसरीचा थरार जालनात सुरू, पहा संपुर्ण वेळापत्रक...

महाराष्ट्र केसरीच्या थेट मैदानातून- अभिजीत कटके, माऊली, गणेश, शिवराज प्रबळ दावेदार

संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी

छत्रपती शिवाजी महाराज चषक आंतरराज्य कबड्डी स्पर्धा असे होतील उद्घाटनाचे सामने