छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे सकाळच्या सत्रातील सामन्यांचे निकाल

छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट आंतर राज्य कबड्डी स्पर्धा-२०१८ स्पर्धेला काळपासून सुरुवात झाली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. यांच्यावतीने सांगली जिल्हा कबड्डी असो. “छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट आंतर राज्य कबड्डी स्पर्धेचे” आज दुसऱ्या दिवशी सकाळी सत्रात पुरुष विभागाचे ६ सामने व महिला विभागाचे ८ सामने झाले.

महिला विभातात पुणे विरुद्ध सातारा सामनाने सुरुवात झाली. मध्यंतरा पर्यत सातारा कडे २९-२६ अशी आघाडी होती. सोनाली हेलवीच्या आक्रमक चढाईनी बलाढ्य पुणे संघाला चांगलीच दमछाक झाली. मध्यंतरानंतर आम्रपली गलांडे चांगला खेळ करत सातारला अधिक आघाडी मिळवून दिली नाही.

सामन्याच्या अखेरची काही मिनिट शिल्लक असताना सोनालीच्या पकडीने सामना पुणे कडे फीरला, पुणे संघाने ५९-५४ असा विजय मिळवला. पुणे कडून रुतीका हुमनेने चांगल खेळ केला. सातारच्या सोनाली हेलवीने केलेली एकतर्फी झुंज वर्थ ठरली. पण या सामन्यात सोनाली हेलवीने एकटीने तब्बल चढाईत ३६ गुण मिळवत एक नवीन विक्रम केला.

मुंबई उपनगर विरुद्ध रायगड या महिलांच्या सामन्यात उपनगरने ३६-२१ अस विजय मिळवला. उपनगर कडून चढाईत सायली नागवेकर व कोमल देवकर ने चांगला खेळ केला. तेजस्वी पाटेकर व राणी उपहारने पकडीत चांगला खेळ केला. रायगड कडून मोनाली घोंगे व समीक्षा पाटील यांनी चांगला खेळ केला पण त्याना अपयश आले.

पुरुष विभातात रायगड विरुद्ध बीड सामना रायगड ने ४६-१८ असा सहज जिंकला. रायगड कडून चढाईत सुलतान डांगे व बिपीन थले यांनी चांगला खेळ केला. मयूर कदम ने चांगल्या पकडी केल्या. ठाणे विरुद्ध रत्नागिरी यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात ठाणेने ३९-३३ असा जिंकला. ठाणे कडून प्रशांत जाधव व असलम इनामदार यांनी चांगला खेळ केला.

आतापर्यंत झालेल्या सामन्याचे संक्षिप्त निकाल:
पुरुष विभाग:
१) रायगड ४६ विरुद्ध बीड १८
२) सांगली ४६ विरुद्ध अहमदनगर २७ (काल झालेला)
३) रत्नागिरी ३३ विरुद्ध ठाणे ३९
४) मुंबई शहर ४७ विरुद्ध नाशिक २९
५) नंदुरबार ५४ विरुद्ध अमरावती २०
६) कोल्हापूर ३४ विरुद्ध नागपूर १५
७) पुणे ३९ विरुद्ध भंडारा १४

महिला विभाग:
१) पुणे ५९ विरुद्ध सातारा ५४
२) मुंबई उनगर ३६ विरुद्ध रायगड २१
३) रत्नागिरी ४८ विरुद्ध अहमदनगर १६
४) पालघर ५१ विरुद्ध सिंधुदुर्ग ०८
५) ठाणे ४५ विरुद्ध अमरावती १७
६) नाशिक २८ विरुद्ध नागपूर २४
७) मुंबई शहर ५२ विरुद्ध अकोला ०७
८) कोल्हापूर ३६ विरुद्ध बुलढाणा १०

महत्त्वाच्या बातम्या:

एशिया कपसाठी कर्णधार सुनिल छेत्रीची टीम इंडिया तयार

एकवेळ टीम इंडियाला धू-धू धूणारा फलंदाज घेतोय सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास

आयपीएल- एकवेळ दिल्ली गाजवलेला खेळाडू आता मुंबईच्या ताफ्यात