यजमान सांगली सह रायगड, मुंबई शहर पुरुष विभागात, तर पुणे, मुंबई उपनगर, पालघर महिला विभागातील संघाचा बादफेरीत प्रवेश

इस्लामपूर, सांगली येथे जयंत पाटील खुले नाट्यगृह या मैदानात सुरू असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट आंतर राज्य कबड्डी स्पर्धेचे” काल दुसऱ्या दिवशी झालेल्या साखळी सामन्यातील निकालानंतर पुरुष विभागात रायगड, सांगली, मुंबई शहर, ठाणे, कोल्हापूर यांनी बादफेरीतील प्रवेश निश्चित केला.

तर महिला विभातात पुणे, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी या संघांनी बादफेरीत प्रवेश मिळवला आहे.

पुरुष विभागात रायगड संघाने आपल्या तिसऱ्या साखळी सामन्यात अमरावती चा ४०-१३ गुणांनी पराभव करत तीन विजयासह गटात अव्वाल स्थान मिळवले. तर यजमान सांगली ने कोल्हापूरचा १४-११ असा पराभव करत तिसऱ्या विजयासह बादफेरीत प्रवेश मिळवला.

महिला विभागात पुणे विरुद्ध ठाणे याच्यात चांगला चुरशी सामना झाला. मध्यंतरा पर्यंत पुणेकडे १८-१६ अशी नाममात्र आघाडी होती. पुणेकडून आम्रपली गलांडे चांगला खेळ करत पुणेला ३४-२५ असा विजय मिळवून दिला.

साखळीतील तीन विजयासह पुणेने बादफेरीत प्रवेश मिळवला. महिला विभागात मुंबई उनगरने नागपूरचा ३०-०४ असा सहज पराभव करत साखळीतील तिसरा विजय मिळवला. तसेच कोल्हापूर विरुध्द पालघर यांच्यात चुरशीची लढत झाली. मध्यंतरापर्यत १६-१२ अशी आघाडी पालघर कडे होती. पालघर कडून लता पांचाल व ऐश्वर्या काळे यांनी चांगला खेळ करत ३४-३२ विजय मिळवत तिसरा साखळी सामना जिंकला.

आज होणाऱ्या साखळी सामन्यानंतर बादफेरीचा चित्र स्पष्ट होईल. महिला विभागात ठाणे विरुद्ध सातारा, रायगड विरुद्ध नाशिक, कोल्हापूर विरुद्ध सिंधुदुर्ग आणि मुंबई शहर विरुद्ध अहमदनगर हे चारही निर्णायक सामने आज होतील. तर पुरुष विभागात नंदुरबार विरुद्ध बीड, ठाणे विरुद्ध पुणे, मुंबई उपनगर विरुद्ध नाशिक हे साखळीतील सामने निर्णायक असतील.

महत्त्वाच्या बातम्या:

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे सकाळच्या सत्रातील सामन्यांचे निकाल

कोहलीच्या आक्रमक स्वभावाचे विंडिजच्या दिग्गज फलंदाजाने केले समर्थन…