“चिंतामणी चषक” राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेचे असे होणार बादफेरीचे सामने

“चिंतामणी चषक” राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगण, लाल मैदान येथे सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेच्या काळ (१० जानेवारी) दुसऱ्यादिवशी साखळी सामने खेळवण्यात आले.

जय बजरंग रायगड विरुद्ध गोल्फदेवी सेवा मंडळ मुंबई यांच्यात झालेला सामना गोल्फादेवी संघाने ३८-३१ असा विजय मिळवत ‘अ’ गटात विजयी झाले. गोल्फादेवी संघाकडून धनंजय सरोद व जयेश वारशीने चांगला खेळ केला.

श्री राम क्रीडा मंडळ पालघर विरुद्ध ग्राफिन जिमखाना ठाणे यांच्यात अटीतटीची लढत झाली. मध्यंतराला १८-१० अशी आघाडी ग्राफिन जिमखाना कडे होती. उत्तरार्धात श्री राम पालघर संघाने चांगला खेळ करत सामना २८-२८ असा बरोबरीत सोडला. श्री राम मंडळाकडून अक्षय व प्रतीक यांनी चांगला खेळ केला. गटात दोन्ही संघाचे ३-३ गुण झाल्यामुळे गुणांच्या फरकानुसार श्री राम मंडळ गटात विजयी झाले.

वाघजाई रत्नागिरी विरुद्ध ओम कल्याण यांच्यात झालेल्या लढतीत वाघजाई रत्नागिरी संघाने ४३-२० असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत मिळवला. दुर्गामाता स्पो. मुंबई विरुद्ध विकास क्रीडा मंडळ मुंबई यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात दुर्गामाता संघाने ३०-२८ अशी बाजी मारत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.

पहिल्यात दोन दिवसात सर्व १८ साखळी सामने झाले. साखळीतील निकाल नंतर १२ संघांनी बाद फेरीत प्रवेश मिळवला. त्यात दुर्गामाता स्पो. मुंबई, श्री राम मंडळ पालघर, गोल्फादेवी मुंबई, वाघजाई रत्नागिरी या चार संघानी थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. उर्वरित बादफेरीतील ८ संघ उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळातील.

आज होणारे सामने:
उपउपांत्यपूर्व सामने

१) ओम कल्याण ठाणे विरुद्ध उत्कर्ष क्रीडा मंडळ पुणे

२) जय बजरंग रायगड विरुद्ध विजय बजरंग व्या. मुंबई

३) ग्राफिन जिमखाना विरुद्ध सम्राट क्रीडा मंडळ सांगली

४) श्री साई नाशिक विरुद्ध सिद्धी प्रभा मुंबई

उपांत्यपूर्व सामने

१) दुर्गामाता मुंबई विरुद्ध उपउपांत्यपूर्व १ विजयी

२) श्री राम मंडळ पालघर विरुद्ध उपउपांत्यपूर्व २ विजयी

३) गोल्फादेवी मुंबई विरुद्ध उपउपांत्यपूर्व ३ विजयी

४) वाघजाई रत्नागिरी विरुद्ध उपउपांत्यपूर्व ४ विजयी