मुलीच्या वाढदिवसाला गेलची शतकरूपी खास भेट!

मोहाली। आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात पार पडलेल्या सामन्यात पंजाबने 15 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ख्रिस गेलने शतकी खेळी करून पंजाबच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

त्याचबरोबर त्याने त्याची मुलगी ख्रिसलियानाला तिच्या वाढदिवसाची खास भेट म्हणून हे शतक तिला समर्पित केले आहे. तिचा उद्या(20एप्रिल) दुसरा वाढदिवस आहे.

तसेच गेल म्हणाला, “मला फक्त स्वत:ला सिद्ध करायच होत आणि जगाने माझ्या नावाचा आदर करावा. पण मला हे शतक माझ्या मुलीला समर्पित करायच आहे. तिचा उद्या वाढदिवस आहे.”

गेलने आज तब्बल 11 षटकार आणि 1 चौकारासह 63 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या आहेत. हे त्याचे आयपीएलमधील 6 वे शतक आहे. तसेच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आहे.

याबरोबरच त्याचे हे ट्वेन्टी 20 मधील 21 वे शतक आहे. ट्वेन्टी 20 मध्ये सर्वाधिक शतके करण्याचाही विक्रम ख्रिस गेलच्याच नावावर आहे. या यादीत ब्रेंडन मॅक्युलम, ल्युक राईट आणि मायकल क्लिंगर विभागून 7 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

आजच्या सामन्यात पंजाबने गेलच्या शतकाच्या जोरावर 20 षटकात 3 बाद 193 धावा केल्या होत्या आणि हैद्राबादसमोर विजयासाठी 194 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकात 4 बाद 174 धावाच करता आल्या.

हैद्राबादकडून कर्णधार केन विलियम्सन(54) आणि मनीष पांडेने(57*) अर्धशतके केली होती, पण त्यांना बाकी फलंदाजांची योग्य साथ मिळाली नाही.

महत्वाच्या बातम्या: