आयपीएल लिलाव: हा मोठा खेळाडू राहिला अनसोल्ड

आज बंगलोरमध्ये आयपीएल लिलाव सुरु झाला आहे. आयपीएलच्या या लिलावात यावर्षी अनेक मोठे खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असल्याने फ्रॅन्चायझींमध्ये चुरस बघायला मिळत आहे.

पण या लिलावात आश्चर्याचा धक्का बसला तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल अनसोल्ड राहिल्याने. यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि सर्फराज खान यांना कायम केले होते.

बंगलोर संघाने या लिलावात न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमला ३.६० करोड मध्ये खरेदी केले आहे. चेन्नईने परदेशी खेळाडूंसाठी दोन्ही आरटीएम कार्ड वापरले असल्याने त्यांना मॅक्युलमला संघात कायम ठेवता आले नाही.