ख्रिस गेल वादळाचा बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये तडाखा, केले ९ खास विक्रम !

ढाका । आज येथील बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ख्रिस गेलच्या शतकाच्या जोरावर रंगपूर रायडर्स संघाने खुलणा टायटन्स संघावर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. गेलने शतकी खेळी करताना ५१ चेंडूत नाबाद १२६ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

या खेळीत गेलने असंख्य विक्रम केले. त्यातील हे ७ खास विक्रम

१.

ख्रिस गेलचे हे ट्वेंटी२० प्रकारातील १९वे शतक आहे. ट्वेंटी२० प्रकारात सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो अव्वल असून दुसऱ्या क्रमांकावर तीन खेळाडू असून त्यांनी प्रत्येकी ७ शतके केली आहेत.

२.

ख्रिस गेलने आजपर्यत ट्वेंटी२० प्रकारात १९ शतके केली असून त्यातील हे तिसरे वेगवान शतक होते.

३.

ख्रिस गेलने आजच्या सामन्यात तब्बल १४ षटकार खेचले आहेत.

४.

ख्रिस गेलने आज ट्वेंटी२० प्रकारात वैयक्तिक ८०१ षटकारांचा टप्पा पार केला.

५.

२०११ पासून गेलने प्रत्येक वर्षी ट्वेंटी२० प्रकारात एकतरी शतकी खेळी केली आहे.

६.

ट्वेंटी२० प्रकारात एका सामन्यात १० पेक्षा जास्त षटकार गेलने १४व्यांदा मारले आहे. दुसऱ्या क्रमांकावर ३ खेळाडू असून त्यांनी दोनवेळा अशी कामगिरी केली आहे.

७.

गेलने कसोटीपेक्षा (१५) ट्वेंटी२० प्रकारात(१९) जास्त शतकी खेळी केल्या आहेत.

८.

ट्वेंटी२० प्रकारात बाद फेरीत गेलने केलेल्या नाबाद १२६ह्या सर्वोच्च धावा आहेत.

९.

गेलने आज तब्बल ११४ मीटर लांब षटकार खेचला आहे.