ख्रिस गेलपासून सावध रहा! ह्या खेळाडूने दिला इशारा

मुंबई | आयपीएलच्या 11 व्या सामन्यात ख्रिस गेल रविवारी पहिल्यांदाच पंजाबकडून खेळताना मैदान उतरला होता.  किंग्स इलेव्हन पंजाबकडून मैदानात उतरलेल्या ख्रिस गेलने चेन्नई सुुपर किंग्स विरुध्द खेळताना धमाकेदार अर्धशतकी खेळी केली.

चेन्नई सुुपर किंग्स विरुध्द खेळताना ख्रिस गेलने  22 चेंडूमध्ये  अर्धशतक केले होते.  हे त्याचे वैयक्तिक दुसरे जलद अर्धशतक आहे.  त्याच्या या स्फोटक फलंदाजीमुळे  किंग्स इलेव्हन पंजाबने चेन्नई विरुद्ध  197  धावांचे विशाल लक्ष्य उभे केले होते.

गेलची हिच स्फोटक खेळी बघुन गेलबरोबर सलामीला खेळण्यासाठी आलेल्या लाकेश राहुलने विरोधी संघाला इशारा दिला आहे.  लाकेश राहुल म्हणाला की,  गेलचा फाॅर्म परत आला आहे. ही पंजाबसाठी आंनदाची गोष्ट आहे. त्यामुळे विरोधी संघानी सावध व्हावे.

लोकेश राहुल म्हणाला की, ही आमच्या संघासाठी चांगली गोष्ट आहे व दुसऱ्या संघासाठी  वाईट बातमी आहे.  आपल्या सर्वांना माहितीये की, गेल एकटा कोणताही सामना जिंकवू शकतो व समोरच्या गोलंदाजाना उध्वस्त करु शकतो. गेलने हे आधीही करुन दाखवल आहे.

आयपीएल आॅक्शनमध्ये ख्रिस गेलला त्याचा मागील संघ  रॉयल चेलेंजर्स बेंगलोरने विकत घेतले नव्हते. दोन वेळा अनसोल्ड राहिल्यानंतर शेवटी किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला 2 कोटी रुपयाना खरेदी केले होते.  त्यामुळे पहिल्याच सामन्यात स्फोटक खेळी करत त्याने ही निवड योग्य असल्याचे दाखवून दिले.