हा खेळाडू ख्रिस गेलला मानतो रोल माॅडेल

कोलकाता | काल झालेल्या सामन्यात  कोलकाता नाइट राइडर्सने दिल्ली डेअरडेविल्सचा 71 धांवानी पराभव केला होता.  या विजयात अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने महत्त्वाची भुमिका बजावली होती. त्याने 12 चेंडुत 41 धांवाची स्फोटक खेळी केली होती.

आंद्रे रसेलच्या या स्फोटक खेळाची तुलना ख्रिस गेलशी होत आहे. रसेल म्हणाला की, मी गेलला राेल माॅडेल मानतो . तो युनिवर्सल बाॅस आहे. मी त्याची जागा नाही घेऊ शकत.

रसेलचा या सामन्यात स्ट्राइक रेट 342 होता.  त्याच्या या  खेळीच्या जोरावर कोलकाताने  दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध 200 धांवाचे विशाल लक्ष्य उभे केले होते.

ख्रिस गेल स्वताला युनिवर्सल बाॅस  म्हणतो.  सर्वच खेळाडू व चाहते देखील त्याला या नावानेच बोलवतात.  तुफानी खेळीनंतर रसेल म्हणाला की, मी ख्रिस गेलला आदर्श मानतो. मी फक्त त्याच्याप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करतो. गेलबरोबर माझी तुलना करू नये, तो युनिवर्सल बाॅस आहे.

धावांच्या बाबतीत रसेल आयपीएलमध्ये सध्या  दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 51 च्या सरासरीने 4 सामन्यात 152 धावा केल्या आहेत. या यादीमध्ये संजू सॅमसन 178 धांवासह पहिल्या स्थानावर आहे.

कोलकातासाठी आंद्रे रसेल महत्त्वाची भुमिका बजावत आहे. रसेल फलंदाजी बरोबरच गोलंदाजी देखील करतो. त्यामुळे तो कोलकात्यासाठी  महत्त्वाचा खेळाडू आहे.