टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा आहे वेस्ट इंडीजचा संघ

वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही कसोटी मालिका कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे. या मालिकेसाठी 13 जणांच्या वेस्ट इंडीज संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या मालिकेत वेस्ट इंडीजचे नेतृत्व जेसन होल्डर करणार आहे. तसेच अष्टपैलू क्रिकेटपटू राहकिम कॉर्नवॉललाही 13 जणांच्या वेस्ट इंडीज संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याला या मालिकेतून कसोटीत पदार्पण करण्याची संधी आहे. त्याने भारत अ संघा विरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेत वेस्ट इंडीज अ संघाकडून चांगली कामगिरी केली आहे.

तसेच वेस्ट इंडीज अ संघाचा कर्णधार शामर्ह ब्रूक्सलाही या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघात संधी मिळाली आहे.

त्याचबरोबर या मालिकेत अनुभवी सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलला मात्र संधी देण्यात आली नाही. तो या कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणे अपेक्षित होते. पण त्याला या कसोटी मालिकेसाठी संधी मिळालेली नाही.

या कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान अँटिग्वाला होणार आहे. त्यानंतर 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान जमैकाला दुसरा कसोटी सामना होईल.

कसोटी मालिकेसाठी असा आहे वेस्ट इंडीजचा 13 जणांचा संघ – 

जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शमर्ह ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, राहकिम कॉर्नवॉल, शेन डोव्हरीच, शॅनन गॅब्रिएल, शिमरोन हेटमेयर, शाय होप, किमो पॉल, केमर रोच.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

१२ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेने कसोटीत केला होता अजब कारनामा

स्वातंत्र्यदिनी एमएस धोनी करणार हे खास काम?

विंडीज विरुद्धच्या पहिल्या वनडेतील विराट कोहलीचा हा व्हि़डिओ होतोय व्हायरल