आज मैदानात उतरताच ‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलच्या नावावर होणार हा मोठा विक्रम

पोर्ट ऑफ स्पेन। आज(11 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना होणार आहे. हा सामना क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर होणार असून या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल.

हा वनडे सामना वेस्ट इंडीजचा आक्रमक सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलसाठी खास ठरणार आहे. गेलला जर या सामन्यात 11 जणांच्या संघात संधी मिळाली तर तो वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणारा खेळाडू ठरेल. तसेच 300 वनडे सामने खेळणारा वेस्ट इंडीजचा पहिलाच खेळाडू ठरेल.

त्याने सध्या त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 299 वनडे सामने खेळले आहेत. त्यामुळे तो सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या वेस्ट इंडीजच्या खेळाडूंच्या यादीत ब्रायन लारासह अव्वल क्रमांकावर आहे. लारा यांनी देखील 299 वनडे सामने खेळले आहेत. त्यामुळे आज गेलला लारांच्या या विक्रमाला मागे टाकण्याची संधी आहे.

गेलला लाराचा आणखी एक विक्रम मोडण्याची संधी – 

गेलने या सामन्यात जर 9 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ठरेल.

सध्या हा विक्रम लारा यांच्या नावावर असून त्यांनी 299 वनडे सामन्यात 10405 धावा केल्या आहेत. तसेच गेलच्या नावावर सध्या 299 वनडे सामन्यात 10397 धावा आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारत-वेस्ट इंडीज संघात आज होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्याबद्दल सर्वकाही…

न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने आयपीएलबद्दल केले मोठे भाष्य

सुरेश रैनाच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया; इतक्या दिवसांसाठी राहणार क्रिकेटपासून लांब