ठरलं! ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेल तेव्हा करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेल 2019 विश्वचषकानंतर भारताविरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबद्दल गेलने 2019 विश्वचषकात उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध विंडीज सामन्याआधी मीडियाशी बोलताना सांगितले आहे.

पण 2014 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळलेल्या गेलला त्याच्या निवृत्तीचा कसोटी सामना खेळण्यासाठी 22 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत विंडीज संघात संधी मिळणार का हे पहावे लागेल.

कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक खेळणारा गेल त्याच्या निवृत्तीबद्दल म्हणाला, ‘हा विश्वचषक शेवट नाही, मी अजून काही सामने खेळणार आहे. कदाचीत अजून एक मालिका.कोणाला काय माहीत, बघू पुढे काय होते.’

तसेच गेलला विश्वचषकानंतरच्या त्याच्या योजनेबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, ‘विश्वचषकानंतर माझ्या योजना? मी कदाचीत भारताविरुद्ध कसोटी सामना खेळेल आणि मी भारताविरुद्ध वनडे मालिका नक्की खेळणार आहे. पण मी टी20 मालिका खेळणार नाही हे नक्की. हीच माझी विश्वचषकानंतर योजना आहे.’

वेस्ट इंडीजचे मीडिया व्यवस्थापक फिलीप स्पूनर यांनी नंतर स्पष्ट केले की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल भारताविरुद्ध शेवटचे खेळेल. ते म्हणाले, ‘हो, ख्रिस भारताविरुद्ध शेवटची मालिका खेळेल.’

या विश्वचषकानंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या विंडीज दौऱ्यात भारतीय संघ सुरुवातीला 3 ते 6 ऑगस्टदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका, तर 8 ते 14 ऑगस्टदरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर 22 ऑगस्टपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

गेलने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 103 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 42.19च्या सरासरीने 7215 धावा केल्या आहेत.

तसेच तो वनडेमध्ये वेस्ट इंडिजचा सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत वनडेमध्ये 295 वनडे सामन्यात 38.17 च्या सरासरीने 10345 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी20मध्ये गेलने 58 सामने खेळताना 32.54 च्या सरासरीने 1627 धावा केल्या आहेत.

याबरोबरच गेलने कसोटीमध्ये 2 त्रिशतकेदेखील केली आहेत. तसेच वनडेमध्ये त्याच्या नावावर एक द्विशतकही आहे. तर टी20 मध्ये त्याने विंडीजकडून 2 शतकेही केली आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

पीटरसनने केलेल्या त्या टीकेवर मॉर्गनने दिले असे उत्तर, पहा व्हिडिओ

२७ वर्षांनंतर न्यूझीलंड-पाकिस्तानच्या या दोन खेळांडूबाबत घडला अनोखा योगायोग

गांगुलीपाठोपाठ भारताच्या या दिग्गज क्रिकेटपटूनेही दिला एमएस धोनीला पाठिंबा