जेव्हा ख्रिस गेल थिरकतो सनी लिओनच्या आयटम सॉन्गवर…

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा एक खास विडिओ सध्या सोशल मेडियावर जोरदार गाजतोय. सफेद रंगाचे कपडे आणि बूट घातलेल्या गेल लैला मै लैला या गाण्यावर नाचताना यात दिसत आहे.

हे गाणं यापूर्वी बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनवर शूट झालं आहे. विशेष म्हणजे ख्रिस गेलच्या यातील बऱ्याच स्टेप्स या सनी लेओन सारख्याच आहेत.

या गाण्यात गेलच्या पाठीमागे हिरव्या रंगाचा पडदा असल्यामुळे हे एखाद्या जाहिरातीसाठीच शूट असल्याचं लगेच समजत. गेलने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की जर कुणी असा डान्स केला तर त्याला मी ५ हजार डॉलर एवढी रक्कम देईल. यासाठी पुरुष किंवा महिला कुणीही भाग घेऊ शकत.

गेल सध्या खूपच कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेस्ट इंडिज संघाकडून खेळतो. भारताबरोबर झालेल्या एकमेव टी२० सामन्यात ख्रिस गेल वेस्ट इंडिजकडून खेळला होता.