ख्रिस वोक्ससाठी लॉर्ड्स ठरले सोन्याची अंडी देणारी कोंबडी

इंग्लंडकडून या डावात अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने शतक केले. त्याचे हे कसोटीतील पहिलेच शतक आहे.

या शतकाबरोबर आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक, पहिले अर्धशतक, पहिल्या पाच विकेट्स आणि पहिल्या दहा विकेट्स लॉर्ड मैदानावर मिळवण्याचा मान मिळवला आहे.

2016 साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात लॉर्ड्स मैदानावर ख्रिस वोक्सने पाकिस्तानच्या पहिल्या डावात 6 विकेट घेत कसोटी कारकिर्दीत प्रथम 5 पेक्षा जास्त विकेट मिळवण्याची किमया केली होती.

तर याच सामन्यात पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात वोक्सने 5 विकेट्स मिळवत, कसोटी कारकिर्दीतील एका सामन्यात १०  विकेट मिळवण्याची पहिलीच वेळ होती.

2016 साली लॉर्ड्सवर झालेल्या श्रीलंके विरुद्धच्या कसोटी सामन्यात, इंग्लंडच्या पहिल्या डावात वोक्सने 66 धावांची खेळी करत कारकिर्दीतले पहिले अर्धशतक झळकावले होते.

तर भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात वोक्सने तिसऱ्या दिवशी नाबाद १२० धावा करत कसोटी कारकिर्दीतील पहिले शतकही लॉर्ड्सवरच झळकावत अनोखा पराक्रम केला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-प्रीमियर लीग: एनगोलो कांटे आणि हॉर्हीनियोने केलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीचा विजय

-दिग्गज माजी गोलंदाजाची इंशांत शर्मावर स्तुतीसुमने