इंडिया ब्ल्यू संघाने जिंकले दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद

7 सप्टेंबरला दुलीप ट्रॉफी 2018 चे विजेतेपद फेझ फेझल कर्णधार असलेल्या इंडिया ब्ल्यू संघाने जिंकले आहे. त्यांनी अंतिम सामन्यात गतविजेत्या इंडिया रेड संघाविरुद्ध एक डाव आणि187 धावांनी विजय मिळवत हे विजेतेपद जिंकले.

इंडिया ब्ल्यू संघाने मागील 3 वर्षात दुसऱ्यांदा दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले आहे.

इंडिया ब्ल्यूच्या विजयात स्वप्निल सिंगने पहिल्या डावात तर दिपक हुडा आणि सौरभ कुमारने दुसऱ्या डावात प्रत्येकी पाच विकेट्स घेत महत्त्वाची कामगिरी बजावली.

या सामन्यात इंडिया रेडने चौथ्या दिवसाची सुरुवात दुसऱ्या डावात 5 बाद 128 धावांवरुन केली. मात्र यानंतर त्यांचा हा डाव 172 धावांवरच संपुष्टात आला. चौथ्या दिवशी इंडिया रेड संघाला फक्त 44 धावांची भर घालता आली.

या सामन्यात इंडिया रेडकडून दुसऱ्या डावात कर्णधार अरविंद मुकुंदने 46 धावा करत थोडीफार लढत दिली होती. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.

इंडिया ब्ल्यूने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 541 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून या डावात निखिल गंगताने 130 धावांची शतकी खेळी केली होती. तर रिकी भुई(60), अनमोलप्रीत सिंग(96) आणि स्वप्निल सिंग(69) यांनी अर्धशतके केली होती.

त्यानंतर इंडिया रेडच्या पहिल्या डावात इंडिया ब्ल्यूकडून स्वप्निल सिंगने 58 धावात 5 विकेट्स घेत इंडिया रेडचा डाव 182 धावातच संपुष्टात आणण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.

या डावात इंडिया रेडकडून फक्त बावनका संदीपने अर्धशतक केले. त्याने 57 धावा केल्या. इंडिया रेडकडून या सामन्यातील हे एकमेव अर्धशतक आहे.

यामुळे इंडिया ब्ल्यूने पहिल्या डावात 359 धावांची भक्कम आघाडी घेतली आणि कर्णधार फेझलने इंडिया रेडला फॉलोआॅन दिला.

फॉलोआॅननंतरही इंडिया रेड संघाकडून एकाही फलंदाजाने विशेष अशी कामगिरी केली नाही. या डावात इंडिया ब्ल्यूकडून दिपक हुडा आणि सौरभ कुमारने अनुक्रमे 56 आणि 51 धावा देत प्रत्येकी 5 विकेट्स घेत इंडिया रेडचा डाव 172 धावांवर संपुष्टात आणला आणि इंडिया ब्ल्यूचा विजय निश्चित केला.

याबरोबरच फैझ फैजलने कर्णधार म्हणून  रणजी ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी बरोबरच दुलीप ट्रॉफीचेही विजेतेपद आता मिळवले आहे.

 

संक्षिप्त धावफलक-

इंडिया ब्ल्यू- पहिला डाव – सर्वबाद 541 धावा (निखिल गंगता -130 धावा, अनमोलप्रीत सिंग – 96 धावा; परवेझ रसुल – 4 विकेट्स/150 धावा)

इंडिया रेड – पहिला डाव – सर्वबाद 182 धावा (बावनका संदीप – 57 धावा; स्वप्निल सिंग – 5 विकेट्स/58 धावा)

इंडिया रेड – दुसरा डाव – सर्वबाद 172 धावा (अभिनव मुकुंद – 46 धावा; सौरभ कुमार – 5 विकेट्स/51 धावा, दिपक हुडा – 5 विकेट्स/56 धावा)

 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

सेरेना विल्यम्स खेळणार नवव्यांदा युएस ओपनच्या अंतिम फेरीत

टाॅप ५- पाचव्या कसोटीत होणार हे खास विक्रम

टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीची अशी आहे आजवरील कामगिरी