एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत प्रणव गाडगीळ याचा मानांकित खेळाडूवर विजय

पाचगणी | रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज्  टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या प्रणव गाडगीळ याने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 16वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या क्वालिफायर प्रणव गाडगीळने आंध्रप्रदेशच्या सातव्या मानांकित लोहित रेड्डीचा 6-1, 6-0असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या अर्जुन गोहडने क्वालिफायर ओम काकडचा 6-1, 6-2असा सहज पराभव केला. दक्ष अगरवालने काफिल कडवेकरचा टायब्रेकमध्ये 4-6, 7-6(6), 6-3असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महाराष्ट्राच्या साहेब सोधी याने तेलंगणाच्या रोहन कुमारचा 5-7, 6-3, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 16वर्षाखालील मुले:
फैज नस्याम(महा)(1)वि.वि.साहिल तांबट(महा) 6-3, 6-3;
प्रसाद इंगळे(महा)वि.वि.क्रिस नासा(महा) 4-6, 6-4, 6-4;
दक्ष अगरवाल(महा)वि.वि.काफिल कडवेकर(महा) 4-6, 7-6(6), 6-3;
यशराज दळवी(महा)(6)वि.वि.निरव शेट्टी(महा) 2-6, 6-4, 6-0;
आदित्य नंदा(हरियाणा)(4)वि.वि.अनर्घ गांगुली(महा) 2-6, 6-3, 7-6(1);
साहेब सोधी(महा)वि.वि.रोहन कुमार(तेलंगणा) 5-7, 6-3, 6-3;
अर्जुन गोहड(महा)(8)वि.वि.ओम काकड(महा) 6-1, 6-2;
प्रणव गाडगीळ(महा)वि.वि.लोहित रेड्डी(आंध्रप्रदेश)(7) 6-1, 6-0;
आयुश भट(कर्नाटक)(5)वि.वि.अथर्व आमरुळे(महा) 6-0, 6-2;
ऋषी जलोटा(चंदीगड)(2)वि.वि.काहिर वारीक(महा) 6-3, 6-4;

16वर्षाखालील मुली:
आदिती आरे(तेलंगणा)(1)वि.वि.हिर किंगर(महा) 6-0, 6-0;
परी चव्हाण(महा)वि.वि.रुमा गायकवारी(महा) 6-1, 6-2;
जिया परेरा(महा)वि.वि.कांजल कंक(महा) 6-1, 6-1.