दुपारी ४ वाजता झाली महाराष्ट्र केसरी विजयच्या चौधरीच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा!

महाराष्ट्र शासनाने ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीची पोलीस उपअधीक्षक पदावर आज नियुक्ती केली. परंतु त्याच्या नोकरीच्या औपचारिक घोषणेची सर्वजण वाट पाहत होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या @CMOMaharashtra या ट्विटर अकॉऊंटवरून त्याची रीतसर घोषणा आज ३ वाजून ४२ मिनिटांनी करण्यात आली. ह्या ट्विटला दोन तासात तब्बल ५० रिट्विट आणि २०० लाईक्स मिळाल्या.