हे तीन नवनिर्वाचित मुख्यमंत्री आधी होते खेळाडू…

भारतात सध्या पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवणुकामध्ये चार राज्यात भाजपचे सरकार आले आहे. त्यात भाजपचे सरकार आलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपैकी तिन राज्यांचे मुख्यमंत्री हे आधी खेळाडू होते. गोवा, मणिपूर राज्यांचे मुख्यमंत्री हे फुटबॉलपटू होते तर पंजाबचे मुख्यमंत्री हे पोलो खेळ खेळतात.

मनोहर पर्रीकर (गोवा)
मनोहर पर्रीकर हे चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. गोवा हे राज्य संपूर्ण देशात फुटबॉल ह्या खेळासाठी प्रसिद्ध आहे. मग त्याला मनोहर पर्रीकर हे कसे अपवाद असतील? पर्रीकर हे फुटबॉल खेळाचे मोठे चाहते आहेत. त्यांची फुटबॉल खेळतानाची छायाचित्रे पण विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहेत.

 

कॅप्टन अमरिंदर सिंग (पंजाब )

पंजाब राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री भूषवित असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग हे पोलो खेळाचे मोठे चाहते आहेत. फावल्या वेळात ते पोलो खेळातात. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे वडील यादवीन्द्र सिंग यांनीही भारताकडून एक कसोटी सामना खेळला आहे. तर आजोबा भूपिंदर सिंग हे सुद्धा क्रिकेटसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी जगातील सर्वात उंचीवरील क्रिकेटची खेळपट्टी बनविली होती. ती अंदाजे २४४३ मीटर उंचीवर होती.

 

एन. बिरेन सिंग (मणिपूर)
नव्यानेच मणिपूरच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारे एन. बिरेन सिंग हे एक फुटबॉलपटू, पत्रकार आणि राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहे. एन. बिरेन सिंग हे देशांतर्गत फुटबॉल खेळले आहेत. तसेच फुटबॉल सामने पाहणे हा त्यांचा छंद आहे.