ठरंल! हे तीन दिग्गज करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयसाठी नेमुन दिलेल्या समितीने(सीओए) भारतीय पुरुष वरिष्ठ संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी कपिल देव प्रमुख असलेल्या तीन सदस्ययी सल्लागार समीतीला दिली आली आहे.

या सल्लागार समीतीमध्ये कपिल देवबरोबरच माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचा समावेश आहे. हे तिघे मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी ऑगस्टच्या मध्यात उमेदवारांच्या मुलाखती घेतील.

याबद्दल सीओएच्या बैठकीनंतर सीओएचे अध्यक्ष विनोद राय म्हणाले, ‘हे तिघे पुरुष संघासाठी मुख्य प्रशिक्षक निवडतील. ही तात्काळ समिती नाही पण सर्व परस्पर हितसंबंधाची समस्येचा विषय आहे. प्रशिक्षक पदासाठीच्या उमेदवारांच्या मुलाखती मध्य-ऑगस्टमध्ये घेण्याचे अपेक्षित आहे.’

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी कपिल देव, गायकवाड आणि रंगास्वामी या तिघांनीच महिला संघासाठी डब्ल्यूव्ही रमण यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली होती.

तसेच याआधी व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर या तिघांचा समावेश असणारी सल्लागार समीती भारतीय पुरुष संघासाठी प्रशिक्षकाची निवड करत होती. पण या तिघांच्या क्रिकेटमधील परस्पर हितसंबंधाचा मुद्दा चर्चेत आहे.

त्यामुळे या तिघांनी सीओएकडून त्यांच्या जबाबदारीबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. या प्रकरणाची पडताळणी बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन करत आहेत.

सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांचा बीसीसीआशी असलेला करार विश्वचषकानंतर संपणार होता. पण त्यांच्या करारात 45 दिवसांची वाढ केली आहे.त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या भारताच्या विंडीज दौऱ्यासाठी रवी शास्त्री आणि सध्याचा सपोर्ट स्टाफ भारतीय संघाबरोबर कायम असतील.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या १४ खेळाडूंचा झाला विंडीजच्या संघात समावेश

अखेर मोहम्मद शमीला या देशात जाण्याचा व्हिजा मिळाला

तब्बल दिडवर्षांनंतर त्या तिन्ही क्रिकेटपटूंचे झाले ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन