केएल राहुल, हार्दिक पंड्याच्या अडचणी वाढल्या, मायदेशी परतण्याचे आदेश…

भारतीय  संघातील क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांनी कॉफी विथ करन या शोमध्ये विवादात्मक विधाने केली होती. यामुळे त्यांच्या भविष्यातील अडचणी वाढल्या आहेत.

हे दोघेही सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या समितीने (सीओए) त्यांना भारतात चौकशीसाठी बोलावले आहे.

या दोघांचा कॉफी विथ करन या शोमधील एपिसोड रविवारी(6 जानेवारी) प्रसारित झाला. या शोमध्ये त्यांनी महिलांबद्दल केलेल्या विवादात्मक विधानांवर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टिका झाली आहे.

न्युज 18च्या वृत्तानुसार भारतात या दोघांच्या चौकशीसाठी बीसीसीआयने सहा सद्यसांची नेमणुक केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या पहिल्या वन-डे सामन्यासाठी या दोघांना संघाबाहेर ठेवले आहे. तर पुढील दोन सामन्यांसाठीही त्यांना संघात जागा न मिळण्याची शक्यता आहे.

याआधीच सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी राहुल आणि पंड्यावर दोन वनडे सामन्यांची बंदी घालण्यात यावी अशी शिफारस केली होती. पण सीएओच्या सदस्या डायना एडुलजी यांनी हे प्रकरण बीसीसीआयच्या लीगल सेलकडे (कायदेशीर मत) पाठवले होते.

या लीगल सेलमध्ये डायना यांनी बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना, कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांचीही मतं मागितली होती.

‘बीसीसीआयच्या चौकशीसाठी 15 दिवस लागू शकतात तोपर्यंत त्या दोघांना संघातून निंलबित करण्यात आले आहे’, असे राय सांगितले आहे.

‘चौकशी पूर्ण होईपर्यंत हार्दिक आणि राहुल या दोघांवरची बंदी कायम ठेवण्यासाठी बीसीसीआयच्या नियमावलीनुसार सीओएला परवानगी आहे .’ असे लीगल सेलने सीओएला सांगितले आहे.

ही चौकशी लांबली गेली तर हार्दिक आणि राहुल या दोघांना ऑस्ट्रेलिया बरोबरच न्यूझीलंड विरुद्धच्या वन-डे मालिकेसाठीही मुकावे लागण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा अंतिम ११ जणांचा संघ

आता विराट कोहलीही हार्दिक पंड्या, केएल राहुलच्या विरोधात…

पहिल्या वनडे सामन्यात या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी

आनंद लुटण्यासाठी, फिट राहण्यासाठी खेळा – राजवर्धनसिंग राठोड