15व्या आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत कॅग्निझंट, टीसीएस संघांची आगेकुच

पुणे: आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत कॅग्निझंट संघाने  अॅमडॉक्स् संघाचा तर टीसीएस संघाने विप्रो संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

व्हिजन क्रिकेट अकादमी मौदान येथे झालेल्या सामन्यात अमन वाणीच्या आक्रमक गोलंगाजीच्या जोरावर कॅग्निझंट संघाने अॅमडॉक्स् संघाचा 9 गडी राखून मोठा वीजय मिळवला. पहिल्यांदा खेळताना प्रथमेश देशपांडे व अमन वाणी यांच्या आक्रमक गोलदाजीपुढे ऑमडॉक्स् संघ केवळ 14.1 षटकात सर्वबाद 108 धावांत गारद झाला.य 108 धावांचे लक्ष नितेश सप्रेच्या नाबाद अर्धशतकी खोळीच्या जोरावर कॅग्निझंट संघाने 14.4 षटकात 1 बाद 113 धावा करून सहज पुर्ण करत विजय मिळवला. 15 धावात 4 गडी बाद करणारा  अमन वाणी सामनावीर ठरला.

दुस-या सामन्यात गौरव भोलेरावच्या आक्रमक फलंगाजीच्या बळावर अतीतटीच्या झालेल्या सामन्यात टीसीएस संघाने विप्रो संघाचा 4 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना टीसीएस संघाने 20 षटकात 7 बाद 164 धावा केल्या. यात गौरव भोलेरावने 45 चेंडूत  63 धावा केल्या. 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रवीकिरण बायदची अर्धशतकी खेळी विप्रो संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही व मयंक जसोरे, गौरव सिंग व अभिनव कालिया यांच्या अचूक गोलंदाजीने विप्रो संघाचा डाव 20 षटकात 8 बाद 160 धावांत रोखत टीसीएस संघाने 4 धावांनी निसटता विजय संपादन केला. गौरव भोलेराव सामनावीर ठरला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

अॅमडॉक्स् – 14.1 षटकात सर्वबाद 108 धावा(रोहित लालवानी 33(20), अंकित खरे 28, भावनेश कोहली 21, प्रथमेश देशपांडे 4-31, अमन वाणी 4-15) पराभूत वि कॅग्निझंट- 14.4 षटकात 1 बाद 113 धावा(नितेश सप्रे नाबाद 50(47), करण केसरकर 21, विस्माव सुद नाबाद 24, भावनेश कोहली 1-11) सामनावीर- अमन वाणी

कॅग्निझंट संघाने 9 गडी राखून सामना जिंकला.

टीसीएस- 20 षटकात 7 बाद 164 धावा(गौरव भोलेराव 63(45), सुनिल बाबर 38, विशाल हिरगुडे 2-20) वि.वि विप्रो- 20 षटकात 8 बाद 160 धावा(अक्षय जगदाळे 35, रवीकिरण बायद 54(42), मयंक जसोरे 3-11, गौरव सिंग 2-23, अभिनव कालिया 2-27)सामनावीर- गौरव भोलेराव

टीसीएस संघाने 4 धावांनी सामना जिंकला.