दुसरी कसोटी: भारत दिवस अखेर ३ बाद ३४४ !

पुजारा आणि राहणेची शतके तर केएल राहुलचे कमबॅक सामन्यात अर्धशतक

कोलंबो येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दिवस अखेर ३ बाद ३४४ धावांचा डोंगर रचला आहे. याबरोबर भारताने आपल्या डावाला बळकटी दिली आहे.

नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने फलंदाजी स्वीकारली होती. लगातार दोन सामन्यात विराटने नाणेफेक जिंकली आहे आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतासाठी सलामीला मागील सामन्याचा सामनावीर शिखर धवन आणि दुखापती नंतर कमबॅक करणारा के एल राहुल उतरले.

भारताची धावसंख्या ५६ होती तेव्हा भारताला पहिला झटका शिखर धवनच्या रूपाने बसला. के एल राहुलनही कमबॅक सामन्यात अर्धशतकी खेळी केली आणि तो ३१व्या षटकात धावबाद झाला.

कर्णधार विराट कोहली मात्र चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊन काही चांगली कामगिरीत करता आली नाही आणि तो हेराथच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला. त्यानंतर मैदानावर भारताचा नवीन मिस्टर डिपेंडेबल अजिंक्य रहाणे आला. पुजारा आणि रहाणे दोघांनीही शतकी खेळी केली.

श्रीलंकेकडून हेराथ आणि परेराने प्रत्येकी एक एक विकेट घेतली आहे. पुजारा १२८ धावांवर तर रहाणे १०३ धावांवर खेळत आहेत.