भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समालोचकांच्या नावांची घोषणा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याची चर्चा गेली ४-५ महिने थांबायची नावं घेत नाही. अखेर भारतीय संघ या दौऱ्यावर आज मुंबई विमानतळावरून रवाना झाला. भारतीय संघ ५ जानेवारी रोजी केप टाउन येथे आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे.

या मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी पिक्चर्स नेटवर्क्स (SPN), सोनी टेन(इंग्लिश) आणि सोनी टेन (हिंदी) या चॅनेलवर होणार आहे.

या मालिकेचे इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत समालोचन होणार आहे. त्यासाठी संजय मांजरेकर, हर्षा भोगले, अजय जडेजा, मुरली कार्तिक, विवेक राझदान, आरपी सिंग, जॉन्टी र्होडस आणि दीप दासगुप्ता हे समालोचक म्हणून जबाबदारी पार पडताना दिसतील.

यातील बहुतेक खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेचा दौरा क्रिकेटपटू म्हणून केला आहे.