थंड में थंडा ! सेहवागने केले कुल्फी खात समालोचन

दिल्ली । येथे सुरु असलेला भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा आणि अंतिम कसोटी सामना अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. प्रदूषणामुळे वाया गेलेला वेळ श्रीलंकन क्रिकेटपटुंनी प्रदूषणामुळे खेळण्यास दिलेला नकार तसेच विराट कोहलीने घोषित केलेला डाव यामुळे या सामन्याची मोठी चर्चा झाली.

याचबरोबर सामना भारतात असेल तर मैदानावरील खेळाडूंप्रमाणेच मैदानाबाहेरील एका व्यक्तीची नेहमीच चर्चा होते ती म्हणजे वीरेंद्र सेहवागची. दिल्ली कसोटीतही सेहवागने व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबर समालोचन करताना एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यात सेहवाग कुल्फी खाताना दिसत आहे.

त्याने हा फोटो पोस्ट करताना त्याबरोबर लिहिले आहे, ” सामन्यात कोणतीही परिस्थिती असो, शांत राहा आणि आपली कुल्फी खा. कुल्फी समालोचन.थंड में थंडा !

Whatever be the match situation, stay calm and eat your Kulfi. Kulfi Commentary .
#ThandMeinThanda