मॉडेलिंग, शिक्षणाला टाटा-बाय बाय करत तिने राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

गोल्ड कोस्ट । २१व्या राष्ट्रकूल स्पर्धेत भारतीय महिला संघाने टेबल टेनिसमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. ही कामगिरी करताना अंतिम सामन्यात भारताच्या मनिका बात्राने ११-७, ११-४, ११-७ने विजय मिळवला. सिंगापूरला ३-१ असे पराभूत करत भारतीय संघाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

४ पैकी २ लढती जिंकत मनिका बात्राने भारताला बलाढ्य अशा सिंगापूर संघावर विजय मिळवून दिला. तिने पहिली लढत जिंकल्यावर बेस्ट आॅफ ५ मधील चौथा सामना जिंकत भारताला ५वा सामना खेळायला लागणार नाही याची काळजी घेतली.

२२ वर्षीय ‘दिल्ली गल’ मनिकाना लहान वयात असताना मॉडेलिंगच्या अनेक संधी आल्या होत्या. परंतू तिने आपला भाऊ आणि बहिणीकडून प्रेरणा घेत बाकी गोष्टींना मुरड घातली.

दिल्ली विद्यापीठातील जेसस आणि मॅरीज काॅलेजला शिकत असणाऱ्या मनिकाने खेळावर लक्ष देता यावे म्हणून शिक्षण अर्ध्यात सोडले. याचे फळ म्हणजे २०१६ साली रीओ आॅलिंपिकमध्ये तिला भारताचे नेतृत्व करता आले.

२०१७ साल या खेळाडूसाठी खूपच खराब राहिले.तिची ८०व्या क्रमांकावरून १०० व्या क्रमांकापर्यंत घसरण झाली. आपण २०१८ गोल्ड कोस्ट राष्ट्रकूल स्पर्धेत मेडल आणूच असे तिने २०१७मध्येच सांगितले होते आणि काल तिने ते खरे करुन दाखवले.

ती जेव्हा दिल्ली विद्यापीठातील जेसस आणि मॅरीज काॅलेजला शिकत होती तेव्हा तिला अनेकांनी खेळ सोडून मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला होता. जेव्हा ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. अखेर तिने केवळ चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून काॅलेज बदलले होते.

तिला सरावामुळे वेळ मिळत नसल्यामूळे काॅलेजला जायला जमत नसे. महिन्यात एक किंवा दोनवेळा ती काॅलेजला जात असे. त्यामूळे काॅलेज जिवनातील अनेक गमतीजमतींना तिला मुरड घालावी लागली.

ती दिल्लीच्या जेसस आणि मॅरीजची विद्यार्थीनी होती. परंतू तिने काॅलेज सोडून आता बाहेरून बीएला प्रवेश घेतला आहे.