राष्ट्रकुल स्पर्धाे 2018 : भारताला बाॅक्सिंगमध्ये तिसरे सुवर्णपदक

गोल्ड कोस्ट | आॅस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बाॅक्सरनी आजचा दिवस गाजवला आहे.  विकास कृष्णन याने आज पुरुषांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिकंत भारताला बाॅक्सिंगमधील तिसरे सुवर्णपदक मिळवुन दिले. तर सतीश कुमारने 91 किलो वजनी गटात रौप्यपदक जिकंत आजचा दिवस गाजवला.

विकास कृष्णन याने अंतिम सामन्यात कॅमेरुनच्या विलफ्रेड डियुडोन याचा 5-0 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.   विकास कृष्णन व  विलफ्रेड डियुडोन दोघेही एकमेंकाना आव्हान निर्माण करत होते; पण  विकास कृष्णनने सुरुवातीपासुनच आक्रमक खेळ करत सामन्यावर मजबुत पकड बनवली.

विकास कृष्णन हा पहिला भारतीय पुरुष बाॅक्सर आहे ज्याने राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धा या दोन्हीमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

तसेच, सतीश कुमारला 91 किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात इंग्लंडच्या फ्रेजर क्लार्क कडुन 0-5 असा पराभव स्विकारावा लागला.  त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

त्याआधी सकाळी बाॅक्सिंगमध्ये मेरी कोमने 45-48 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर गौरव सोलंकीने पुरुषांच्या 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक, मनीष कौशीकने 60 किलो वजनी गटात रौप्यपदक व अमित पंघालने 46-49 वजनी गटात रौप्यपदक जिकंत आजचा दिवस गाजवला.

आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ मध्ये भारताला ५९ पदके मिळाली आहेत. यात २५ सुवर्णपदके, १६ रौप्य पदके आणि १८ कांस्य पदके यांचा समावेश आहे. तसेच भारत पदक तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 https://twitter.com/ioaindia/status/985151582651199488