संपूर्ण यादी: ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांची नावे 

३१ डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८ पर्यंत ६५वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा परवाच झाली आहे. 

भारतीय कबड्डी असोशिएशनच्या संकेतस्थळानुसार या स्पर्धत पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागात सामने होणार असून एकूण एकूण ३१ संघ सहभागी होणार आहेत. ६ दिवस चालणारी ही स्पर्धा हैद्राबाद येथील गाचीबोवली इनडोअर स्टेडियमवर होणार आहे.

या स्पर्धेत प्रो कबड्डीमधील अनेक स्टार खेळाडू भाग घेणार असून त्यात महाराष्ट्रातील मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. प्रो कबड्डी आणि अशियन चॅम्पियनशिपमधील मोठ्या यशानंतर देशातील तमाम कबड्डीप्रेमींचे या स्पर्धेकडे लक्ष लागले आहे. 

भारतीय संघ नुकताच गोरगन, इराण येथे अशियन चॅम्पियनशिप जिंकून आला असून याच संघातील खेळाडू आता आपल्या राज्याकडून खेळताना दिसतील. ही स्पर्धा एकप्रकारे कबड्डीची रणजी ट्रॉफी असल्यासारखेच आहे. परंतु त्याकडे आजपर्यत विशेष लक्ष दिले गेले नाही. 

या स्पर्धेत भाग घेणारे संघ

महाराष्ट्र, 

हरियाणा, 

तामिळनाडू, 

उत्तर प्रदेश, 

मध्यप्रदेश, 

हिमाचल प्रदेश, 

आंध्रप्रदेश, 

उत्तराखंड, 

केरळ, 

गुजरात, 

राजस्थान,

मणिपूर, 

ओडिशा, 

पश्चिम बंगाल, 

दिल्ली, 

पॉंडिचेरी, 

गोवा, 

विदर्भ,

तेलंगणा,

आसाम, 

झारखंड,  

छत्तीसगढ, 

जम्मू आणि काश्मीर, 

पंजाब, 

त्रिपुरा, 

कर्नाटक, 

बिहार, 

चंदिगढ, 

सेवादल, 

भारतीय रेल्वे आणि बीएसएनएल